महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच जिवाला धोका? Sangeeta Bhalerao यांची खळबळजनक तक्रार

193
महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच जिवाला धोका? Sangeeta Bhalerao यांची खळबळजनक तक्रार
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच महिला आयोगात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही तक्रार पुणे येथील संगीता भालेराव (Sangeeta Bhalerao) यांनी दाखल केली असून, त्यांनी चाकणकर यांच्यासह सोनाली गाडे आणि स्नेहल चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

(हेही वाचा – Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !)

भालेराव (Sangeeta Bhalerao) यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर यांच्याकडून त्यांना सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांनी ही तक्रार थेट महिला आयोगातच दाखल केली असून, यामुळे महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(हेही वाचा – ‘पाकिस्तानवर भरवसा ठेवता येणार नाही, BSF सज्ज आणि सतर्क’; आयजी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर…”)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातच एवढ्या गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल होणं ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे. संगीता भालेराव (Sangeeta Bhalerao) यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे, त्रास दिला जात आहे आणि मानसिक छळ केला जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापुढे महिला आयोग या तक्रारीची कोणती भूमिका घेतो आणि चौकशीस कोणत्या दिशेने वळण लागते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.