Sandeshkhali Violence : संतप्त लोकांनी शाहजहान शेखच्या मालमत्ता जाळल्या; ममता सरकारच्या वाढल्या अडचणी

539

संदेशखली प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशांत असलेल्या संदेशखलीमध्ये (Sandeshkhali Violence) पुन्हा गोंधळ वाढल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी संतप्त लोकांनी फरार टीएमसी नेता शहाजहान शेखच्या ठिकाणांवर आग लावली. ज्या ठिकाणावर लोकांनी आग लावली, ती जागा शाहजहान शेखचा भाऊ सिराजची असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले.

(हेही वाचा Manohar Joshi : हिंदुत्वाच्या आधारे मते मागितल्याने मनोहर जोशींना १९९१ मध्ये सोडावी लागलेली आमदारकी)

मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस 

भाजपाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ पीडित महिला आणि स्थानिक लोकांची भेट घेण्यासाठी संदेशखली दौऱ्यावर आहे. यावेळी भाजपाचे शिष्टमंडळ संदेशखली (Sandeshkhali Violence) येथे जाताना पोलिसांना त्यांना अडविले. यादरम्यान भाजपा नेत्या आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे शिष्टमंडळही संदेशखलीला भेट देणार आहे. तसेच, संदेशखली हिंसाचारावर मानवाधिकार आयोगाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकार आणि राज्याचे डीजीपी यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. गुरुवारी राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या शिष्टमंडळानेही संदेशखलीला भेट देऊन पीडितांशी संवाद साधला. आदिवासी आयोगाच्या पथकाचे नेतृत्व आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष अनंत नायक यांनी केले. आदिवासी आयोगाकडे जमिनीवर अवैध कब्जा आणि लैंगिक शोषणाच्या २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्य आरोपी टीएमसी नेता शाहजहान शेख हा ५ जानेवारीपासून फरार आहे. तसेच, रेशन घोटाळ्याप्रकरणी ५ जानेवारीला ईडीची टीम त्याच्या आवारात छापा टाकण्यासाठी गेली होती, मात्र शाहजहान शेखच्या समर्थकांनी ईडीच्या टीमवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ईडीचे अधिकारी जखमी झाले. त्या घटनेपासून शाहजहान शेख हा फरार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.