राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभु श्रीराम पुन्हा अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार होत आहे, असे वक्तव्य ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav) ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ या सत्रात ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर गौरव आर्य यांनी विचार मांडले.
(हेही वाचा Shankhnad Mahotsav 2025 : ‘सव्यासची गुरुकुलम’च्या शौर्यप्रदर्शनाने शंखनाद महोत्सवात निर्माण केला वीरश्री !)
या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते. या वेळी सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग चालू केले. सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. समितीने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.’’ सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्मप्रसार केला आहे. तसेच नृत्य, गायन, संगीत याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन त्यांनी केले.’’ पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान म्हणाले की, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav) निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.
Join Our WhatsApp Community