Stalin Defames Sanatan Dharma : सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल मुख्यमंत्री शिंदे – स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बरसले

118
Stalin Defames Sanatan Dharma : सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल मुख्यमंत्री शिंदे - स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बरसले
Stalin Defames Sanatan Dharma : सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल मुख्यमंत्री शिंदे - स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बरसले

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील; पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसच्या चिदंबरम यांचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचा शरद पवारांवर पलटवार; लोक माझे सांगाती… पुस्तकाचा दिला संदर्भ)

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा, तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे २ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीकास्र सोडले आहे.

“हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे ‘INDIA’ आघाडीचा खरा हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राममंदिराला विरोध होता. हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचे काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतो. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपते. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचे काम ते करत आहेत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर ‘INDIA ’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरे तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसे करायचे नसेल, तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे. आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी”, असा घणाघातही त्यांनी केला.

सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे, असे विखारी उद्गार तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले होते. अनेक स्तरांवर टीका होऊ लागल्यावर “ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.