मतदान केल्यानंतर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांना का मिळाले विशेष प्रमाणपत्र ?

164
मतदान केल्यानंतर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांना का मिळाले विशेष प्रमाणपत्र ?
मतदान केल्यानंतर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांना का मिळाले विशेष प्रमाणपत्र ?

देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान (S. Jaishankar) होत आहे. त्यापैकी पाच टप्पे पूर्ण झाले असून, सहाव्या टप्प्यातील जागांसाठी शनिवारी (ता. 25) मतदान सुरू झाले आहे. आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात 8 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान, देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सकाळी दिल्लीतील अटल आदर्श विद्यालयात मतदान केले. मतदानानंतर एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना तेथील शंकर मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रमाणपत्र दिले.

“विक्रमी मतदान करा”

हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच, एस जयशंकर यांनी ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले, “मी आज सकाळी दिल्लीत मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात विक्रमी मतदान करण्याचे माझे सर्व मतदारांना आवाहन आहे.” जयशंकर यांच्या हातात दिसलेल्या प्रमाणपत्रावर ‘प्रथम पुरुष मतदार असल्याचा अभिमान आहे’ असे लिहिले आहे. हे प्रमाणपत्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पहिले मतदान करणाऱ्या पुरुष मतदाराला दिले जाते आहे. (S. Jaishankar)

“भाजप पुन्हा सत्तेत येईल”

जयशंकर (S. Jaishankar) यांना हे प्रमाणपत्र का देण्यात आले याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दिल्लीत मतदान झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “लोकांनी बाहेर पडून मतदान करावे, अशी आमची इच्छा आहे, हा देशासाठी निर्णायक क्षण आहे. मला विश्वास आहे की भाजप पुन्हा सत्तेत येईल.” (S. Jaishankar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.