भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच, रशियाने (Russia) पाकिस्तानसोबत अब्जावधी डॉलर्सचा करार केल्याची खोटी बातमी माध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. रशियाने या वृत्तांचे खंडन केले आहे. रशियाने (Russia) पाकिस्तानशी २.६ अब्ज डॉलरचा करार केल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे काँग्रेसचं आणखी एक देशविरोधी कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानी मिडीयाने रशिया-पाकिस्तान करारावर खोट्या बातम्या चालवल्या. यानंतर कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता काँग्रेसने त्यावर अपप्रचार सुरू केला. काँग्रेस भारताचा जुना मित्र रशियाच्या विरोधात हा खोटा अजेंडा पसरवू पाहत आहे. (Russia)
Another day, another FAKE NEWS amplified by @INCKerala
Pak media planted a lie about Russia backing Pakistan. Russia immediately slammed it as fake and called it an “attempt to undermine relations with India.”
But @INCKerala didn’t wait, they were the first to amplify it. Every… pic.twitter.com/3z7JzeDbNb
— Anoop Antony Joseph (@AnoopKaippalli) May 31, 2025
भारतासोबतचे संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने
काही माध्यमांनी वृत्त दिले आहे की, रशिया (Russia) आणि पाकिस्तानने कराचीमधील सोव्हिएत काळातील स्टील प्लांटला पुनरुज्जीवित करण्यासाठी करार अंतिम केला आहे. खोटे वृत्त प्रसारित होऊ लागताच, रशियन सरकारने स्पष्ट केले की रशिया आणि पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सचा कोणताही करार झाला नाही, ही बातमी भारतासोबतचे संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने असल्याचे म्हटले आहे. (Russia)
India’s most clueless foreign Minister @DrSJaishankar must quit if this is true. That’s the least that he can do now. pic.twitter.com/oSvE78M1Iy
— Congress Kerala (@INCKerala) May 30, 2025
पाकिस्तानी मिडीयाचा दावा
रशियाने या वृत्तांना अफवा आणि भारतासोबतचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, एका पाकिस्तानी माध्यमाने दावा केला होता की, रशिया आणि पाकिस्तानने कराचीमधील सोव्हिएत काळातील स्टील प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठी करार केला आहे. पाकिस्तान स्टील मिल्सची रचना आणि वित्तपुरवठा १९७० च्या दशकात सोव्हिएत युनियनने केला होता. (Russia)
रशियाने करार नाकारला
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांतात असा दावा करण्यात आला आहे की, दोन्ही देशांमध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. तथापि, रशियाने पाकिस्तानी माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तांना खोटे म्हटले आहे. मॉस्कोने अशा करारांवर स्वाक्षरी केल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे आणि भारत आणि रशियामधील मजबूत धोरणात्मक भागीदारीला हानी पोहोचवण्याचा पाकिस्तानमधील घटकांचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ही भागीदारी काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर ती आणखी मजबूत झाली आहे. (Russia)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community