मुंबईत शिवसेना उबाठाला कडवे आव्हान देणार RSS; महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय हस्तक्षेप

मुंबईच्या राजकारणात संघ सक्रीय; प्रत्येक वॉर्डवर लक्ष, हिंदू मतदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साद

85
मुंबईत शिवसेना उबाठाला कडवे आव्हान देणार RSS; महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय हस्तक्षेप
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) जोमाने मैदानात उतरत असल्याची ठोस माहिती समोर आली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उबाठाला धक्का देण्यासाठी संघाकडून रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असल्याने येथे राजकीय वर्चस्व मिळवण्याची चढाओढ सुरू आहे. अशातच मुंबईतील प्रत्येक वॉर्डवर संघाकडून (RSS) बारकाईने नजर ठेवली जात असून, पुढील दोन महिन्यांत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांशी थेट संपर्क करण्याचा संघाचा निर्धार आहे.

(हेही वाचा – Sangli : ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांकडून छळ; ७ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या)

हिंदू मतांवरील ठाकरेंचा एकहाती हक्क संपवणार?

मुंबईतील मराठी आणि विशेषतः हिंदू मतदार हे आजवर शिवसेना उबाठाचे पारंपरिक बळ मानले जात होते. मात्र, २०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींनंतर संघाशी असलेला शिवसेना उबाठाचा संबंध फारसा उरलेला नाही. त्यामुळे आता शिवसेना उबाठाच्या मतवर्गात थेट प्रवेश करून, संघ (RSS) शिवसेना उबाठाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

सर्व्हेच्या माध्यमातून वॉर्डनिहाय रणनीती ठरणार

संघाकडून (RSS) लवकरच वॉर्डनिहाय सर्व्हे सुरू होणार असून, त्यात स्थानिक प्रश्न, सत्ताधाऱ्यांबाबत असलेली नाराजी आणि मतदारांचा कल यावर आधारित वैयक्तिक रणनीती आखली जाणार आहे. संघाचे स्वयंसेवक समाजसेवेच्या माध्यमातून नागरी संवाद साधणार असून, भविष्यात भाजपाला याचा थेट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Bihar : वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना स्कॉर्पिओने उडवले; महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू)

संघाच्या अघोषित रणनितीमुळे शिवसेना उबाठा बेचैन?

राज्यभरात एकीकडे महाविकास आघाडीच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे संघाचा मुंबईतला ‘फोकस’ शिवसेना उबाठासाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण याच मुंबईत उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व उभे राहिले आणि बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक वारसाही टिकून आहे. त्यामुळे संघाचा (RSS) उद्देश स्पष्ट  ‘शिवसेना उबाठाच्या पारंपरिक मतबँकेत हस्तक्षेप.’

हिंदू मतांचा नवा खेळ सुरू!

“मुंबई महानगरपालिका ही फक्त विकासाची नाही, तर हिंदुत्वाचीही लढाई ठरणार आहे”, असा संदेश संघाकडून (RSS) अप्रत्यक्षपणे दिला जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Muhammad Yunus याचा भारताशी चकमकी घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याच आर्मी जनरल ने हाणून पाडला)

राजकीय रणधुमाळीसाठी तयार व्हा!

मुंबई महापालिका निवडणुका जशी जशी जवळ येत आहेत, तशी ती ‘शिवसेना उबाठा विरुद्ध संघ’ असा संघर्ष ठरण्याची शक्यता वाढत आहे. एकीकडे शिवसेना उबाठाचा परंपरागत प्रभाव, तर दुसरीकडे संघाचा (RSS) रणनीतीशील हस्तक्षेप – यामुळे मुंबईतील राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.