Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागात 311 सहायक आयुक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू

59
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागात 311 सहायक आयुक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागात 311 सहायक आयुक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू

राज्यातील पशुसंवर्धन विभागाला (Animal Husbandry Department) अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, आता गट-अ संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या 311 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांनंतर आता ही दुसरी मोठी भरती असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून 20 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करताना एकामागून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांनी याआधीच 2795 पशुधन विकास अधिकारी पदे भरण्याची प्रक्रिया राबवली असून आता प्रशासकीय पातळीवर 311 सहायक आयुक्त पदांच्या भरतीलाही गती दिली आहे.

(हेही वाचा – Labour : कामगारांचे आरोग्य, सरकारचा संकल्प! असंघटित कामगारांसाठी रुग्णालये आणि विम्याचे कवच)

रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना सेवा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करूनच ही भरती हाती घेण्यात आली आहे. विभागाने पूर्ण क्षमतेने आणि अधिक परिणामकारकपणे कार्य करावे, यासाठी तज्ज्ञ, अभ्यासू आणि नवशिक्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

या भरतीमुळे ग्रामीण भागातील पशुसंवर्धन सेवा अधिक बळकट होणार असून, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच पशुपालकांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होणार आहे. “ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाचे (Animal Husbandry Department) काम गतीमान करणे आणि ग्रामीण भागातील पशुपालकांना थेट लाभ मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry Department) सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही भरती एक मैलाचा दगड ठरणार असून, राज्यातील पशुपालन व्यवसायाला आणि संबंधित योजनांना अधिक बळकटी मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.