BJP ने सोडचिठ्ठी दिल्यावर संविधानाची आठवण? वंचितचा Shiv Sena UBT ला सवाल

वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चेतन अहिरे यांनी राऊत यांच्यावर टीका करताना आता संविधान वाचवण्याची आठवण झाली का? असा सवाल केला.

187
Shiv Sena UBT चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व?

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit) शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांना सुनावले. राऊत यांनी संविधान वाचवायचे असल्याचा उल्लेख केला मात्र त्यांचा हा कांगावा म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज को’ म्हणजे भाजपने तुम्हाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तुम्हाला संविधान वाचवण्याचा साक्षात्कार झाला, आशा शब्दात वंचित (Vanchit) आघाडीने उबाठा नेत्यांना जागा दाखवली. (BJP)

आता संविधानाची आठवण?

वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चेतन अहिरे यांनी राऊत यांच्यावर टीका करताना आता संविधान वाचवण्याची आठवण झाली का? असा सवाल केला. (BJP)

(हेही वाचा – Veer Savarkar : मुरबाड येथील महाराष्ट्र मिलीटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न)

सकाळ-संध्याकाळ प्रबोधन

राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर तोंडसुख घेताना अहिरे म्हणाले, “राज्यसभेचे खासदार, प्रवक्ते राऊत यांनी त्यांचा सकाळ-संध्याकाळ चाललेला प्रबोधनाचा कार्यक्रम अजून थांबवलेला दिसत नाही. राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना एका गोष्टीची आठवण करुन दिली की येत्या लोकसभेत आपल्याला संविधान वाचवायचे आहे. मात्र, हे त्यांचे बोलणे म्हणजे सौ चुहे खा के..” असे वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे अहिरे यांनी म्हटले. (BJP)

भाजपने सोडचिठ्ठी दिल्यानंतर साक्षात्कार

वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे अहिरे पुढे म्हणाले की, “गेले कित्येक वर्ष भाजपसोबत सत्तेत असताना तुम्हाला कधीच संविधान वाचवण्याची आठवण आली नाही. भाजपने तुम्हाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तुम्हाला संविधान वाचवण्याचा साक्षात्कार झाला असावा.” (BJP)

“आम्हाला संविधान वाचवायचे आहे. म्हणून आम्ही नेहमीच समझोता करत आलो. पण गेली अडीच वर्ष तुम्ही तडजोड करु शकला नाही, हे लक्षात ठेवा,” असा टोलाही त्यांनी लगावला. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.