पहलगाम हल्ल्याविरोधात निघालेल्या रॅलीत सिंधूचे पाणी थांबवणे चुकीचे म्हणणाऱ्या Rakesh Tikait यांना पगडी काढून पिटाळून लावल्याचे समोर आले. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची पगडी काढत परत जाण्याचे नारे देण्यात आले. सिंधूचे पाणी थांबवणे चुकीचे आहे, चोर पाकिस्तानात नाहीत, असे राकेश टिकैत म्हणाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आयोजित रॅलीत पोहोचलेल्या राकेश टिकैत(Rakesh Tikait)ला लोकांनी हाकलून लावले.
(हेही वाचा Pahalgam Terror Attack : हल्ल्यातून बचावलेले सुबोध पाटील यांनी सांगितला थरारक अनुभव, म्हणाले)
दि. ०२ मे २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फनगरमध्ये पहलगाम हल्ल्याविरोधात आयोजित रॅलीत पोहोचलेल्या राकेश टिकैतला लोकांनी हाकलून लावले. या रॅलीत राकेश टिकैत(Rakesh Tikait) सामील झाले तेव्हा खूप धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात टिकैत यांची पगडीही फेकून देण्यात आली. या रॅलीदरम्यान जमावाने ‘राकेश टिकैत-परत जा’ असे नारेदेखील दिले. हा प्रकार मुझफ्फरनगर शहरात जनआक्रोश रॅली आयोजित करताना घडला.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान कोणीतरी त्याच्या डोक्यावर झेंडा मारला. या झटापटीतून स्थानिक पोलिसांनी राकेश टिकैत(Rakesh Tikait) यांना सुरक्षितपणे घेऊन गेले. पहलगाम हल्ल्यावरील टिकैत यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरुद्ध हा निषेध झाला. पहलगाममध्ये २६ जणांच्या मृत्यूनंतर टिकैत म्हणाले होते की चोर पाकिस्तानमध्ये नाहीत तर आपल्यातच आहेत आणि या हल्ल्याचा शेवटी फायदा कोणाला होईल. त्यांनी सिंधू पाणी कराराचे निलंबन ही चूक असल्याचेही म्हटले. त्यानंतर लोकांनी याला तीव्र विरोध केला.(Rakesh Tikait)
Join Our WhatsApp Community