Lok Sabha Elections 2024 : राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’चा एकला चलो रे, मतविभागणीचा फायदा महायुतीला

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’ चा नारा देत लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

132
Lok Sabha Elections 2024 : राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’चा एकला चलो रे, मतविभागणीचा फायदा महायुतीला
Lok Sabha Elections 2024 : राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’चा एकला चलो रे, मतविभागणीचा फायदा महायुतीला

शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) ‘एकला चलो रे’ चा नारा देत लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मतविभागणीची शक्यता वर्तवली जात असून याचा थेट लाभ महायूतीला होऊ शकतो. (Lok Sabha Elections 2024)

चारपैकी ३ खासदार शिंदेंकडे

राजू शेट्टी ज्या सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत त्यात हातकनंगले (धैर्यशील माने, शिवसेना), कोल्हापूर (संजय महाडीक, शिवसेना), सांगली (सांजयकाका पाटील, भाजप), माढा (रणजित नाईक-निंबाळकर, भाजप), परभणी (संजय जाधव शिवसेना) आणि बुलढाणा (प्रतापराव जाधव, शिवसेना) या मतदार संघांचा समावेश आहे. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Chunabhatti Firing : चुनाभट्टी गोळीबारातील हल्लेखोराला मदत करणाऱ्या ज्वेलर्ससह आणखी दोन जणांना अटक)

शेट्टी हातकणंगलेमधून

यातील हातकणंगले मतदार संघातून स्वतः शेट्टी (Raju Shetty) लढण्याची शक्यता आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ अशा सलग दोन वेळा शेट्टी यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले तर २०१९ मध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) माने निवडून आले. या सहापैकी चार जागांवर शिवसेनेचे (Shiv Sena) आणि २ भाजपचे (BJP) खासदार आहेत. शिवसेनेच्या चारपैकी माने, महाडीक आणि प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर संजय जाधव उबाठा मध्ये आहेत. (Lok Sabha Elections 2024)

तिरंगी लढत होण्याची शक्यता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या जागांवर आपले उमेदवार दिल्यास या मतदार संघांमध्ये स्वाभिमानी, महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीच्या मतविभागणीचा फायदा महायुतीला होऊ शकतो. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.