कोल्हापुरात राजकीय भूकंप! Rajesh Kshirsagar यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत केला ‘हा’ दावा

80
कोल्हापुरात राजकीय भूकंप! Rajesh Kshirsagar यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत केला 'हा' दावा
  • प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आता कोल्हापुरातून मोठा राजकीय स्फोट घडला आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत असा दावा केला आहे की, “कोल्हापुरमधील काँग्रेसचे तब्बल ३५ माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.”

पत्रकार परिषदेत बोलताना क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणाले, “फक्त १० नव्हे, ३५ नगरसेवक आमच्यासोबत येणार आहेत. हे टप्प्याटप्प्याने घडेल आणि विरोधकांचे राजकीय गणित पूर्णतः कोलमडेल.” त्यांच्या या दाव्यामुळे सतेज पाटील यांच्यासह कोल्हापुरातील काँग्रेस नेतृत्वावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Bangladesh Yunus Government : स्थानिक पक्ष, लष्कराचा विरोध अशातच भारताविरोधात ओकली गरळ; मोहम्मद युनूस यांची खुर्ची धोक्यात?)

जूनच्या पहिल्या आठवड्यातच काही दिग्गज काँग्रेस नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील, अशीही माहिती त्यांनी दिली. “शिवसेना कोल्हापुरात प्रथमच महापौर पद मिळवेल,” असा आत्मविश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कोल्हापुरात लक्ष घालत आहेत.”

या पार्श्वभूमीवर त्यांनी पूर्वीच्या पालकमंत्र्यांवरही सडकून टीका केली. “त्यांनी सत्तेचा गैरफायदा घेतला, शहरासाठी काहीच केले नाही. आज मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी आणला जात आहे, म्हणूनच विरोधी पक्षातील अनेक नेते आता आमच्याकडे येत आहेत,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – IPL 2025 Point Table : पंजाब पहिल्या दोन संघांत तर मुंबई चौथी, बंगळुरूला पहिल्या दोनांत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?)

हद्दवाढीच्या मुद्द्यावर बोलताना क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणाले, “हद्दवाढ झालीच पाहिजे, त्याशिवाय निवडणूक नको.” त्यांनी नाना कदम यांच्या बहिष्कार विधानावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले, मात्र हद्दवाढ निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. राजकीय धुरळा उडवत, काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवणारा क्षीरसागरांचा हा दावा आगामी महापालिका निवडणुकांची दिशा आणि दशा बदलू शकतो, अशी जोरदार चर्चा आता कोल्हापुरात सुरू झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.