Raj Thackeray यांचे विधानसभेसाठी भाजपाशी युतीचे स्पष्ट संकेत

मनसे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी इच्छुक नाही, असे स्पष्ट शब्दात सांगत राज ठाकरे यांनी या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार नसल्याचे स्पष्ट करून जागेची आग्रही मागणी न करता महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला.

161
Raj Thackeray यांचे विधानसभेसाठी भाजपाशी युतीचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ९ एप्रिलला पारंपरिक गुढी पाडवा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर भाजपा नेतृत्वाखालील महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाशी युती करण्याचे संकेतही दिले. एक मात्र नक्की की या ठाकरेंमुळे महायुतीची ताकद वाढली. (Raj Thackeray)

विधानसभेसाठी कामाला लागा

मनसे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी इच्छुक नाही, असे स्पष्ट शब्दात सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार नसल्याचे स्पष्ट करून जागेची आग्रही मागणी न करता महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला. आज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभेसाठी कामाला लागा, असा आदेशही दिला. राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी विधानसभेवर आमदार निवडून देण्यावर ठाकरे यांचा अधिक भर असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते. त्यामुळे लोकसभेसाठी फार ताठर भूमिका न घेता, विधानसभेला किमान २०-२५ जागांचे ध्येय मनसेने डोळ्यासमोर ठेवले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Raj Thackeray Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार; ट्वीट करून म्हणाले…)

भाजपाशी सूत जुळले

सध्याची राजकीय समीकरणे लक्षात घेता महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्हीपैकी एकाशी युती करून निवडणूक लढवण्याशिवाय अन्य मार्ग नाही. गेली १८ वर्षे मनसे पक्ष कुणाशीही युती न करता स्वतंत्र निवडणुका लढत आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेपर्यंत कायम राहिली तर स्वतंत्र निवडणूक लढवून फारसे काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे मनसेला युती किंवा आघाडीसोबत जुळवून घेत पक्ष वाढवण्यासाठी काही राजकीय तडजोड करणे भाग आहे, अन्यथा एखाद-दुसऱ्या जागेवर समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. सध्या राज यांचे भाजपाशी सूत जुळल्याचे दिसत असल्याने महायुती हा एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. (Raj Thackeray)

चित्रपट एक माध्यम

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा चित्रपटदेखील प्रदर्शित करण्याची योग्य वेळ ही विधान सभेपूर्वीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाहीर सभा आणि भाषणे करून जी भूमिका जनतेपुढे जाते त्यापेक्षा अधिक प्रभावी आणि घरोघरी पोहोचण्यासाठी चित्रपट हेच योग्य माध्यम असल्याचे गेल्या काही वर्षात अधोरेखित झाले आहे. ‘कश्मीर फाइल्स’ ‘केरला स्टोरी’ यासोबतच राज्यात दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय भूमिका लोकांसमोर गेली. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.