-
प्रतिनिधी
राजकारणात कुठलाही दरवाजा कायमचा बंद नसतो, याचे प्रत्यंतर सध्या शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युती चर्चेतून दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय ‘पुनर्मिलन’ होणार का, यावरून चर्चेला उधाण आले आहे. (Thackeray VS Thackeray)
“राज ठाकरेंनी आता महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा!” – अनिल परब
शिवसेना उबाठा आमदार अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “उद्धव ठाकरे यांनी आधीच आपली भूमिका मोकळेपणाने मांडली आहे. ते सर्व वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहेत. आता निर्णय राज ठाकरे यांचा आहे!”
परब पुढे म्हणाले, “शिवसेना यूबीटीने संवादाचे दरवाजे कधीही बंद केले नाहीत. महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा आहे की, ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावे. आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत.” (Thackeray VS Thackeray)
(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा; म्हणाले, “”माझ्या नसांमध्ये रक्त…”)
राजकीय भूमिकेच्या केंद्रस्थानी ‘महाराष्ट्राचा हिताचा निर्णय’
अनिल परब यांनी राज ठाकरेंना थेट उद्देशून सांगितले की,”तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्ही उद्धवजींशी हातमिळवणी करणार की नाही. निर्णय तुमच्या हातात आहे.”ते म्हणाले की, जर दोन्ही नेते भेटले, तर अंतिम निर्णय तेच घेतील आणि पक्ष त्यानुसार पुढे जाईल.
मुंबईतील राजकीय गणित बदललं… म्हणून ‘मनसे’ ला गळ घालण्याचे प्रयत्न?
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की,”मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची माजी नगरसेवकांची मोठी घसरण शिंदे गटाकडे झाली आहे.”त्यामुळे मुंबईत शिवसेना उबाठा कमजोर झाल्याचे चित्र स्पष्ट असून, त्यामुळेच मनसेला सोबत घेण्यासाठी हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. (Thackeray VS Thackeray)
‘शिवसेना – मनसे’ युती : स्वप्न की वास्तव?
- निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय डावपेचांमध्ये गुंतागुंत वाढली आहे.
- एकत्र येण्यासारखी भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली जात असली, तरी राज ठाकरेंकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
(हेही वाचा – Greece Earthquake : ग्रीसमधील क्रेट बेटावर ६.१ तीव्रतेचा भूकंप; युरोपात त्सुनामीचा धोका)
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?
शिवसेना उबाठातील इच्छाशक्ती दिसून येत असली, तरी ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ चा संघर्ष ‘ठाकरे सोबत ठाकरे’ मध्ये कधी आणि कसा बदलेल, हे येणारा काळच ठरवेल.
राजकीय निरीक्षकांच्या मते, “ही युती जर झाली, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणाला भूकंपसदृश धक्का मिळू शकतो!”
राजकारणात काहीही अशक्य नाही… पण प्रश्न एवढाच — ‘राज’ ठरवणार कोणाच्या मनाचा? (Thackeray VS Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community