Raj Thackeray : राज ठाकरेंनी मागितल्या दोन जागा; अमित शाह काय म्हणाले ?

Raj Thackeray : राज यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर शाह यांनी एकच जागा शक्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचे म्हटले.

326
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मागितल्या दोन जागा; अमित शाह काय म्हणाले ?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मागितल्या दोन जागा; अमित शाह काय म्हणाले ?

मंगळवार, १९ मार्च रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले, याचबरोबर राज ठाकरे एनडीएत (NDA महायुतीत) जाणार की नाही, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही याविषयी माहिती दिली आहे. अमित शाह-राज ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले, याविषयी तर्क लावले जात आहेत.

(हेही वाचा – Uttar Pradesh : उत्तरप्रदेशात दुहेरी हत्या करणारा धर्मांध आरोपी पोलीस चकमकीत ठार)

शब्द देणे शक्य नाही ?

राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे लोकसभेच्या (Loksabha Election 2024) २ जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. राज यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर शाह यांनी एकच जागा शक्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचे म्हटले. यानंतर राज यांनी लोकसभेनंतर पुढे काय, असे विचारले. यावर सध्या कोणताही शब्द देणे शक्य नसल्याचेही शाह यांनी म्हटल्याचे समजते आहे. विधानसभेच्या जागावाटपाविषयी तेव्हाच ठरवू शकतो, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.

राज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी यासंबंधी चर्चा केली होती. यानंतरच ते दिल्लीला जायला तयार झाले होते. मुंबईतील बैठकीत मनसेने तीन जागांचा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगण्यात येते. दोन जागांचाही प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे.

मनसेची मते कुणाला ?

भाजपने (BJP) मागणीनुसार जागा न दिल्यास राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मनसेला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? हा चर्चेचा विषय आहे. मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर १५ ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होते. यामुळे मनसेची मते निर्णायक ठरू शकतात. (Raj Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.