• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, May 9, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home सत्ताबाजार Raj Thackeray : इंजिन चिन्हाबाबत तडजोड नाहीच, राज ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट
  • सत्ताबाजार

Raj Thackeray : इंजिन चिन्हाबाबत तडजोड नाहीच, राज ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट

रेल्वे इंजिन चिन्हाबाबत कोणतीही तडजोड नाही, असा विश्वासच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणादरम्यान दिला.

April 9, 2024
775
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Raj Thackeray Press Conference: राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देत निवडणुकीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले...

    मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही तर स्वत:चा पक्ष काढेन असाच निर्धार केला आणि १८ वर्षांपूर्वी हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. हा पक्ष तुमच्या सर्वांच्या विश्वासावर उभा आहे. या आपल्या पक्षाला रेल्वे इंजिन हे चिन्ह तुमच्या सर्वांच्या कष्टाने मिळाले आहे, ते काही सहज मिळालेले नाही. त्यामुळे या रेल्वे इंजिन चिन्हाबाबत कोणतीही तडजोड नाही, असा विश्वासच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणादरम्यान दिला. (Raj Thackeray)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात माध्यमांच्या प्रतिनिधींची टर उडवत त्यांनी त्यांना ‘आम्हाला असे वाटते’ असाच उल्लेख केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर काहीच होत नसल्याने माध्यमांनी राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशा बातम्या पेरायला सुरुवात केली. मला जर शिवसेनेचे पक्षप्रमुख व्हायचे असते तर मी तेव्हाच झालो नसतो का? माझ्या घरी ३२ आमदार, ६-७ खासदार जमले होते, तेव्हा मी सांगितले होते मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. मी स्वतःचा पक्ष काढीन पण बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, असे आधीच ठरवले होते. तरीही मी एकाला संधी दिली होती, पण समजलेच नाही, असे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले. (Raj Thackeray)

    (हेही वाचा – Raj Thackeray : डॉक्टर्स, नर्सेससह शिक्षकांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती, राज ठाकरे यांनी दिला इशारा)

    मी जे अपत्य जन्माला घातले आहे. त्या मनसे पक्षाचाच अध्यक्ष राहणार, त्यामुळे मनसैनिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या विश्वासावर हा पक्ष उभा केला आहे, १८ वर्षे झाली आहेत. अशा गोष्टी माझ्या मनालाही शिवत सुद्धा नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट करत जागा वाटपाच्या चर्चेत आपण कधी जातच नाही. १९९५च्यानंतर कधीच आपण या चर्चेत बसलो नाही. माझे ते टेंपरामेंटच नाही. आमच्या निशाणीवर लढा असे मला सांगण्याचा प्रयत्न झाला, पण रेल्वे इंजिन हे चिन्ह मला तुमच्या सर्वांच्या कष्टाने मिळाले आहे, सहज मिळालेले नाही. त्यामुळे इंजिन चिन्हाशिवाय अन्य कुठल्याही चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार नाही आणि इंजिन चिन्हाबाबत तडजोड अजिबात होणार नाही असाही विश्वास त्यांनी मनसैनिकांना दिला. (Raj Thackeray)

    दिल्लीत गेलेले ठाकरेच पहिले कसे?

    आपण दिल्लीत गेल्यानंतर दिल्लीत गेलेले पहिलेच ठाकरे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, याचा समाचार घेताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १९८०मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दिल्लीत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटण्यास गेले होते. मी अमित शाह यांना भेटायला गेलो तरी चर्चा. पण त्यांना भेटायला गेला तर काय हरकत आहे. माझ्याही घरी भेटायला येतात. यात मोठेपणा किंवा कमीपणा असण्याचे काय असाही सवाल त्यांनी केला. (Raj Thackeray)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • balasaheb thackeray
    • Chhatrapati Shivaji Maharaj Maidan
    • delhi
    • engine logo
    • Gudhipadwa Melawa
    • Mumbai
    • raj thackeray
    • shiv sena
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleRaj Thackeray Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार; ट्वीट करून म्हणाले…
      Next articleRaj Thackeray : …आणि राज ठाकरेंनी त्यावेळेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’मागील कारण स्पष्टच सांगितले
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • India Pakistan War : लवकरात लवकर लाहोर सोडा; अमेरिकेच्या नागरिकांना सूचना May 9, 2025
      • India Pakistan War : इस्त्रायली जनता का म्हणत आहे Thank You India ?; २३ वर्षांनी मिळाला पत्रकाराला न्याय May 9, 2025
      • India Pak War: सीमेवरील चकमकीत मुंबईचा जवान हुतात्मा; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली May 9, 2025
      • पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात May 9, 2025
      • Rohit Sharma Retires : रोहित शर्माचा वारसदार कोण? माजी कसोटीपटूने सुचवलं ‘हे’ नाव May 9, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • India Pakistan War : लवकरात लवकर लाहोर सोडा; अमेरिकेच्या नागरिकांना सूचना May 9, 2025
      • India Pakistan War : इस्त्रायली जनता का म्हणत आहे Thank You India ?; २३ वर्षांनी मिळाला पत्रकाराला न्याय May 9, 2025
      • India Pak War: सीमेवरील चकमकीत मुंबईचा जवान हुतात्मा; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली May 9, 2025
      • पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात May 9, 2025
      • Rohit Sharma Retires : रोहित शर्माचा वारसदार कोण? माजी कसोटीपटूने सुचवलं ‘हे’ नाव May 9, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline