Raj Thackeray: वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय ?

211
Raj Thackeray: वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय ?
Raj Thackeray: वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय ?

पुणे लोकसभा (Raj Thackeray) निवडणुकीत वसंत मोरे (Vasant More) बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले. (Raj Thackeray)

आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत

वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसे सोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब (Raj Thackeray) नाराज आहेत, पण बघू काय करतात. असे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो. काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू. असं ते म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले होते वसंत मोरे ?

मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा फोन घेण्याचे टाळले. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे (Vasant More) म्हणाले होते की, “पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा (Raj Thackeray) फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल.” असे वसंत मोरे (Vasant More) म्हणाले होते. परंतु आता वसंत मोरे (Vasant More) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. आपण राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.