Raj Thackeray : ‘तयारीला लागा मी येतोय’; राज ठाकरेंचा चार दिवस नाशिक दौरा

मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे चार दिवस तळ ठोकणार आहे. १ ते ४फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

140
Raj Thackeray : 'तयारीला लागा मी येतोय'; राज ठाकरेंचा चार दिवस नाशिक दौरा

काही दिवसांनंतर नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी , ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात नाशिक ला भेट दिली तसेच अनेक नेते मंडळी नाशिकला भेट देत आहे. त्यांनतर नाशिकचे राजकीय महत्व चांगलेच वाढले आहे. त्यानंतर मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे हे देखील नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर राज ठाकरे यांनी सांगितले नाशिक पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की तयारीला लागा मी यतोय अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. (Raj Thackeray)

१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकच्या काळा राम मंदिरात हजेरी लावली.आगामी लोकसभेच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिलाच आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा दौरा आखला आहे. (Raj Thackeray)

२००८ साली नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. तर २०१२ साली नाशिक महापालिकेत मनसेचे तब्बल ४० नगरसेवक निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र मनसेला नाशिकचा गड राखता आला नाही. तर नाशिक मध्ये काही नवीन नेत्याना संधी देण्यात येईल अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या काय रणनीती आखणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचा : Deepak Kesarkar: अभियांत्रिकी शाखेत मराठी विषय सक्तीचा, दीपक केसरकर यांचा आदेश)

तयारीला लागा मी येतोय – राज ठाकरे
नाशिकमध्ये लोकसभेची तयारी सुरू झाली असताना एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे चार दिवस तळ ठोकणार आहे. १ ते ४फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.