भारतीय स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या काळकोठडीतून विचारांचा प्रकाश दिला, त्या महापुरुषांवर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ‘ब्रिटिशांचा सेवक’ अशी टीका करत आपल्या वैचारिक दारिद्र्याची आणि इतिहासद्रोहाची पातळी दाखवून दिली होती. आज सुप्रीम कोर्टानं जी झणझणीत कानउघाडणी केली ती योग्यच! ही फटकार केवळ न्यायालयीन नाही तर राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता तरी त्यांचं डोकं ताळ्यावर येईल. अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.
राहुल गांधींनी आणखी एक लक्षात घ्यावं की, शब्द हे शस्त्र असतात आणि शस्त्र हाताळताना विवेक हवा, अन्यथा ते तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहत नाहीत, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. वीर सावरकर यांचा अकोला येथे भारत जोडो यात्रेदरम्यान अवमान केल्याच्या प्रकरणी ही याचिका करण्यात आली होती. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत? जर तुम्ही भविष्यात असे कोणतेही विधान केले तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ आणि कारवाई करू. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना फटकारले आहे.
म्हणे, सावरकर हे इंग्रजांचे सेवक होते
हा मानहानीचा खटला १७ नोव्हेंबर २०२२ चा आहे. जेव्हा राहुल यांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) एका रॅलीत सावरकरांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर, २०२३ मध्ये वकील नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली.
त्यांनी अकोल्यात माध्यमांना एक पत्र दाखवले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, हे पत्र सावरकरांनी इंग्रजांना लिहिले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की ते इंग्रजांचे सेवक राहतील. त्यांनी भीतीपोटी माफीही मागितली. गांधी-नेहरूंनी हे केले नाही, म्हणून ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले.
गांधी, नेहरू आणि पटेल यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचे कारण भीती होती. जर त्यांना भीती नसती, तर कधीच सही केली नसती. जेव्हा सावरकरांनी स्वाक्षरी केली, तेव्हा त्यांनी भारताच्या गांधी आणि पटेलांचा विश्वासघात केला होता. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community