Rahul Gandhi vs Mamata Banerjee : राहुल गांधींचे आश्वासन दीदींचा ‘काटा’ काढण्यासाठी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या एक-एक नेत्याचा काटा काढायला सुरुवात केली आहे.

70
Rahul Gandhi vs Mamata Banerjee : राहुल गांधींचे आश्वासन दीदींचा 'काटा' काढण्यासाठी
Rahul Gandhi vs Mamata Banerjee : राहुल गांधींचे आश्वासन दीदींचा 'काटा' काढण्यासाठी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या एक-एक नेत्याचा काटा काढायला सुरुवात केली आहे. ही बाब तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आली असून त्यांनी दीदींना सावधगिरीचा इशारा दिला असल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसमधील नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाराज आहेत. त्यांची ही नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे, राहुल गांधी यांनी ‘जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्येनुसार भागीदारी’चा मुद्या रेटून लावणे होय. (Rahul Gandhi vs Mamata Banerjee)

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतील एकमेव अशा नेत्या आहेत ज्यांनी देशपातळीवर जातीनिहाय जनगणना करण्याच्या मुद्यावर साधा ब्र सुध्दा उच्चारलेला नाही. त्या या मुद्यापासून जेवढ्या अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत आहेत; राहुल गांधी तेवढ्याचे जोमाने हा मुद्या रेटून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रानुसार, राहुल गांधी ममता बॅनर्जी यांना केवळ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत नाही आहेत तर त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून सुध्दा बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Rahul Gandhi vs Mamata Banerjee)

(हेही वाचा – Israel Hamas Conflict : गाझा येथील इस्लामिक विद्यापीठावर इस्रायलचा बॉम्बहल्ला; हमासच्या आतंकवाद्यांचा तळ उद्ध्वस्त)

या मुद्यावर सविस्तर बोलताना सूत्राने सांगितले की, जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्येनुसार भागीदारी या दोन्ही गोष्टींचा स्वीकार ममता बॅनर्जी करू शकत नाही. कारण, बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या २७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, राजकीय भागीदारी फक्त १५ टक्के आहे. २९४ सदस्यांच्या विधानसभेत ४२ मुस्लिम आमदार आहेत. जी १५ टक्क्यांच्या आसपास येते. लोकसंख्येनुसार भागीदारी द्यायची झाली तर ही संख्या किमान ७९ एवढी असायला पाहिजे. २०१६ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ५७ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. यातील २९ उमेदवार विजयी झाले होते. यानंतही २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने फक्त ४२ मुस्लीमांना उमेदवारी दिली. बंगालमध्ये तीन लाख ३१ हजार २४९ सरकारी कर्मचारी आहेत. यात मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या केवळ १८ हजार ९९१ एवढी आहे. (Rahul Gandhi vs Mamata Banerjee)

अशा परिस्थितीत राहुल गांधी यांच्या आश्वासनानुसार, लोकसंख्येनुसार भागीदारी देण्याचे ठरविले तर दीदींना मुस्लिम आमदारांची संख्या वाढवावी लागेल. निवडणुकीत जास्तीत जास्त मुस्लिमांना उमेदवारी द्यावी लागेल. नेमकी हीच बाब ममता बॅनर्जी यांना नको आहे. असे असताना राहुल गांधी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी सारखे रेटून लावत आहेत. मुळात, ममता बॅनर्जी यांना अडचणीत आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न असल्याची शंका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आली असून त्यांनी दीदींना सावधगिरीचा इशारा सुध्दा दिला आहे. (Rahul Gandhi vs Mamata Banerjee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.