काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इतिहासाचे ज्ञान शून्य असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आजवर ते इतिहासाचे ज्ञान नसल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अवमान करत होते. अखेर त्यांच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी यावर खटले दाखल झाले, तेव्हा न्यायालयाने त्यांना आता त्यांनी केलेल्या आरोपावर इतिहासातील दाखले देण्यास सांगितल्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पळताभुई थोडी झाली आहे. आता याच राहुल गांधी यांनी त्यांचे पणजोबा जवाहलाल नेहरू आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी धादांत चुकीचे वक्तव्ये करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे. एका पॉडकास्टला मुलाखत देताना राहुल गांधी यांनी त्यांचे हसे केले आहे, त्याची क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होते आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
जेव्हा गांधीजी यांना इंग्लंडमध्ये रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून खाली हाकलून दिले, तेव्हा माझे पणजोबा आणि त्यांचे चुलत भाऊ यांनी ठरवले की, ते अलाहाबाद रेल्वे स्थानकात जातील आणि काही ब्रिटिशांना रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून हाकलून देतील ब्रिटिशांनी फेकून देतील. त्याप्रमाणे ते अलाहाबाद रेल्वे स्थानकात गेले आणि त्यांनी काही ब्रिटिशांना रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून फेकून दिले, असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका मुलाखतीत बोलताना म्हटले.
(हेही वाचा Pakistan Army : भारताच्या कारवाईला पाकिस्तानी सैन्यही घाबरले; हजारो जवानांनी दिला राजीनामा)
काय आहे वास्तव?
वास्तव मात्र वेगळेच आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना ७ जून १८९३ या दिवशी साऊथ आफ्रिकेत रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून हाकलून दिले होते. ही घटना इंग्लंडमधील नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मात्र बोलताना ही घटना इंग्लंडमधील असल्याचे म्हटले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे असेही म्हणाले की, त्यानंतर माझे पणजोबा जवाहरलाल नेहरू हे अलाहाबाद रेल्वे स्थानकात गेले आणि त्यांनी काही ब्रिटिशांना रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून हाकलून दिले. वास्तवात मात्र त्यावेळी नेहरू यांचे वय अवघे ३ वर्षे होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी उपरोक्त वक्तव्य करून स्वतःचे इतिहासाविषयीचे घोर अज्ञान प्रकट केले आहेच, त्याचबरोबर स्वतःचे हसेही करून घेतले आहे.
Join Our WhatsApp Community