Milind Deora यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाने ‘दोन्ही राहुल’ अस्वस्थ

एकीकडे काँग्रेसचा ‘हात’ सोडून मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमधील, पर्यायाने राहुल गांधी यांची अस्वस्थता वाढली. तर दुसरीकडे देवरांच्या प्रवेशाने शिवसेना लोकसभा गटनेते राहुल शेवाळे हेदेखील अस्वस्थ झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

178
Milind Deora यांच्यामुळे शिवसेना प्रवेशाने ‘दोन्ही राहुल’ अस्वस्थ
Milind Deora यांच्यामुळे शिवसेना प्रवेशाने ‘दोन्ही राहुल’ अस्वस्थ

एकीकडे काँग्रेसचा ‘हात’ सोडून मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमधील, पर्यायाने राहुल गांधी यांची अस्वस्थता वाढली. तर दुसरीकडे देवरांच्या प्रवेशाने शिवसेना लोकसभा गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) हेदेखील अस्वस्थ झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Milind Deora)

इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व

देवरा यांच्याप्रमाणे राहुल शेवाळेदेखील उच्चशिक्षित असले तरी दिल्लीतील राजकारणात वावरत असताना इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व, याला अत्यंत महत्त्व आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद, अन्य राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी विविध विषयांवरील चर्चा, विविध केंद्रीय समित्यांवरील कामकाज, शासकीय परदेश दौऱ्यादरम्यान, लोकसभा किंवा राज्यसभेतील ‘डिबेट’, बिलावरील चर्चा अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर भाषेचा प्रभाव पाडण्यास मदत होते. त्यात शेवाळे यांच्या तुलनेत देवरा निश्चितच उजवे ठरतात. (Milind Deora)

राष्ट्रीय राजकारणात गेल्या २० वर्षांपासून सक्रीय

देवरा राष्ट्रीय राजकारणात गेल्या २० वर्षांपासून सक्रीय असून त्यांच्या नावाला त्यांचे वडील मुरली देवरा यांच्या कारकिर्दीचे आणि गांधी परिवाराशी असलेले जुने संबंध, याचे वलय असल्याने त्यांना दिल्लीत स्वतःची वेगळी ओळख करुन देण्याची गरज पडत नसावी. यशिवाय केंद्रीय राज्यमंत्री पदाचा अनुभवही देवरा यांच्या गाठीशी आहे. शेवाळे यांना दहा वर्षांपूर्वी नगरसेवक असताना थेट लोकसभा लढविण्याची संधी (२०१४) मिळाली आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (२०२२) त्यांना लोकसभेचे गटनेते पद मिळाले. (Milind Deora)

(हेही वाचा – MHADA : गिरणी कामगार तथा त्यांच्या वारसांची पात्रता: विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ)

कॉँग्रेस पदाधिकारी, व्यापारीही देवरा यांच्या पाठीशी

देवरा यांनी पक्षात प्रवेश करताना कॉँग्रेसचे १० माजी नगरसेवक (Corporators), २५ पदाधिकारी (Office bearers) आणि ४५०-५०० कार्यकर्ते सोबत होते. इतकेच नव्हे तर मुंबईच्या आर्थिक नाड्या नियंत्रणात ठेवणाऱ्या दक्षिण मुंबईतील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, म्हणजेच अगदी कपडा व्यापारी ते थेट हिरा व्यापारी शिवसेनेत आले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांचे कौतुक करताना म्हटले की, देवरा यांनी पक्षप्रवेश करताना काही कार्यकर्ते येतील असे सांघितले मात्र इतका मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेत, असे वाटते की ये तो ट्रेलर ही, पिक्चर अभी बाकी है. विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी बघून शिंदे यांनी हे तर सगळे ‘लक्ष्मीपूत्र’ असल्याचे म्हटले. यावरून, देवरा यांचे पक्षातील वजन वाढणार हे वेगळे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. (Milind Deora)

‘कॉस्मोपोलिटन’ चेहरा

देवरा यांना शिवसेनेच्या निमित्ताने दिल्लीच्या राजकारणात अधिक सक्रीय होण्याची संधी मिळेल तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेला देवरा यांच्यासारखा ‘कॉस्मोपोलिटन’ चेहेरा दिल्लीच्या राजकारणासाठी मिळेल ज्याचा फायदा पक्ष वाढीसाठी होऊ शकेल. (Milind Deora)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.