Pune Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ; जखमींवर मोफत उपचार…

Pune Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ; जखमींवर मोफत उपचार...

84
Pune Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ; जखमींवर मोफत उपचार...
Pune Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ; जखमींवर मोफत उपचार...

मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर (Pune Indrayani River Bridge Collapse) असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल २०० ते २५० पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. (Pune Indrayani River Bridge Collapse)

हेही वाचा-Maval Bridge Collapse : सार्वजनिक बांधकाम विभागाचं साफ दुर्लक्ष; ‘नवीन पुलाच्या निर्मितीस मंजुरी मिळाली, पण…’

कालच्या मुसळधार पावसाने बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. सोमवारी (१६ जून) सकाळी मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणखी वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी बचावकार्य करताना एनडीआरएफसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. कुंडमळा पुलाजवळ नदीच्या पाण्याचा वेग जोरदार आहे. त्यामुळे आता एनडीआरएफचे जवान नदीपात्रात उतरुन कशाप्रकारे बचावकार्य करणार, हे पाहावे लागेल. (Pune Indrayani River Bridge Collapse)

हेही वाचा- Maval Bridge Collapse प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, “ही घटना दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही लोक इथे पर्यटनासाठी आले होते. यादरम्यान हा पूल कोसळला आणि पर्यटक नदीतपात्रात पडले.” (Pune Indrayani River Bridge Collapse)

हेही वाचा- Maval येथील ‘तो’ पूल अनेक महिन्यांपासून होता बंद तरीही कसा कोसळला? जाणून घ्या…

याठिकाणी आधीच आपण बंदीचे आदेश लागू केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये, असे आधीच सांगण्यात आले होते. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच, जखमी व्यक्तींवर मोफत उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pune Indrayani River Bridge Collapse)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.