स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मानहानीच्या खटल्यात पुणे कोर्टाचा Rahul Gandhi यांना समन्स ; 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मानहानीच्या खटल्यात पुणे कोर्टाचा Rahul Gandhi यांना समन्स ; 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

51
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मानहानीच्या खटल्यात पुणे कोर्टाचा Rahul Gandhi यांना समन्स ; 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मानहानीच्या खटल्यात पुणे कोर्टाचा Rahul Gandhi यांना समन्स ; 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

पुणे न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स बजावले आहे. लंडन दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोर्टाने 9 मे रोजी राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. (Rahul Gandhi)

हेही वाचा-Pahalgam Terror Attack: पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारणाऱ्या ‘पोनी ऑपरेटर’ला गंदरबलमधून अटक ; काय आहे प्रकरण ?

दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यासंदर्भात पुणे न्यायालयाने 9 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींना कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Rahul Gandhi)

 

दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांचे सहकारी होते आणि त्यांना इंग्रजांकडून निवृत्तिवेतन मिळत होते’ या वक्तव्यावर राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. सावरकरांवर राहुल गांधी बरळल्यास आता सुप्रीम कोर्ट स्वत: कारवाई करेल. इतिहास जाणून न घेता वक्तव्य करू नका. तुम्ही राजकीय पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. त्यामुळे सावरकरांवर बोलू नये, असे सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना बजावले आहे. (Rahul Gandhi)

स्वातंत्र्ययोद्ध्यांचा इतिहास-भूगोल न जाणता विधाने करू नये- सुप्रीम कोर्ट
“सुप्रीम कोर्टात हा खटला सुरू असताना “भारताच्या इतिहासाबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांविषयी असे बोलू नये. अशी कोणतीही टिप्पणी करू नये,” असे खंडपीठाने खडसावले. न्यायमूर्ती दत्ता पुढे म्हणाले, “राहुल एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. अशा टिप्पणी का करता, त्यांची (सावरकरांची) तिथे पूजा केली जाते. त्यामुळे अशी विधाने करू नये, जर केलीच तर आम्ही स्वत:हून त्याची दखल घेऊ, त्यामुळे असे करू नका.” (Rahul Gandhi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.