देश काँग्रेसवर नाराज आहे आणि त्याच्या “पापांची” शिक्षा देत आहे, PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर घणाघात

पंतप्रधान मोदी यांनी जालोर जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचार सभेत "या" पक्षावर सडकून टीका केली.

88
PM Narendra Modi : पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

देशभक्तीने भरलेल्या राजस्थानला  (Rajasthan) माहित आहे की, काँग्रेस (Congress) भारताला कधीही मजबूत बनवू शकत नाही. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात निम्म्या राजस्थानने काँग्रेसला शिक्षा केली आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी जालोर जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचार सभेत बोलले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Narendra Modi: काँग्रेसने ‘टेक सिटी’ला ‘टँकर सिटी’ बनवलं, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, देश काँग्रेसला त्यांच्या “पापांची” शिक्षा देत आहे आणि एकेकाळी ४०० जागा जिंकणारा पक्ष या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा लढवू शकत नाही. तसेच २०१४ पूर्वी जी परिस्थिती होती ती परत यावी, अशी देशाची इच्छा नाही. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत मांडले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Japanese Navy Helicopters Crash: जपानी नौदलाचे २ हेलिकॉप्टर्स प्रशिक्षणादरम्यान प्रशांत महासागरात कोसळले; २ ठार, ७ बेपत्ता

काँग्रेसने घराणेशाही (Congress Dynasticism) आणि भ्रष्टाचार पसरवून देश पोकळ केला आहे आणि आज देश काँग्रेसवर नाराज आहे आणि या पापांची शिक्षा देत आहे. सध्याच्या स्थितीसाठी काँग्रेस पक्षालाच जबाबदार धरले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जालोर जिल्ह्यातील भीनमाल (Jalore district Bhinmal) येथे भाजप उमेदवार लुंबाराम चौधरी यांच्या जाहीर सभेला संबोधित करत होते. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली!

राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा (Rajasthan Lok Sabha 2024) आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले आणि उर्वरित १३ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.