पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये चार दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद 4 मे पर्यंत सुरू राहील. (Waves 2025) भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी WAVES 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. वेव्हज हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे जे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्याचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (Waves 2025)
हेही वाचा-America : “आता परिणाम भोगायला तयार रहा…” अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी
यावेळी परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज 100 हून अधिक राष्ट्रांमधील कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. आम्ही प्रतिभा आणि सर्जनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचत आहोत. वेव्हज हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे जे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्याचे आहे. गेल्या शतकात, भारतीय चित्रपटसृष्टीने भारताला जगाच्या प्रत्येक भागात लोकप्रिय करण्यात यश मिळवले आहे. यात राज कपूर यांची रशियामधील लोकप्रियता, सत्यजित रे यांची कान्समधील लोकप्रियता आणि आरआरआरच्या ऑस्करमधील यशावरून स्पष्ट होते.” असं मोदी म्हणाले. (Waves 2025)
“आज १ मे आहे. ११२ वर्षांपूर्वी 3 मे 1913 रोजी, भारतात राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके जी होते आणि काल त्यांची जयंती होती. गेल्या शतकात, भारतीय चित्रपटसृष्टीने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवले आहे. प्रत्येक कथा भारतीय संस्कृतीचा आवाज बनली आहे आणि जगभरातील लाखो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे.” (Waves 2025)
हेही वाचा- Pahalgam Attack नंतर भारतात ‘या’ पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड !
“आज त्या काळातील कल्पनाशक्ती प्रत्यक्षात आली आहे आणि WAVES च्या रूपात पृथ्वीवर आली आहे. ज्याप्रमाणे नवीन सूर्य उगवताना आकाशाला रंग देतो, त्याचप्रमाणे ही शिखर परिषद त्याच्या पहिल्या क्षणापासूनच चमकू लागली आहे. WAVES त्याच्या पहिल्या आवृत्तीतच जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमच्या सल्लागार सहकाऱ्यांनी केलेले कठोर परिश्रम येथे दिसून येत आहे. WAVES मध्ये जगभरातील सर्जनशील व्यावसायिक, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान उद्योजक उपस्थित असतात. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ ही WAVES 2025 ची टॅगलाइन आहे.” असं पंतप्रधान म्हणाले. (Waves 2025)
हेही पहा-‘
Join Our WhatsApp Community