
ऑस्ट्रेलियामध्ये अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सलग दुसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. देशाच्या राजकारणात २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान पंतप्रधानाला सलग पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पीटर डटन यांचा पराभव केला. (Anthony Albanese)
Congratulations @AlboMP on your resounding victory and re-election as Prime Minister of Australia! This emphatic mandate indicates the enduring faith of the Australian people in your leadership. I look forward to working together to further deepen the India-Australia…
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2025
दरम्यान, या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन केले. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. (Anthony Albanese)
हेही वाचा-Ladki Bahin Yojana साठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांचा 745 कोटींचा निधी वर्ग
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हा ऐतिहासिक विजय दर्शवितो की ऑस्ट्रेलियातील लोकांना अजूनही तुमच्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील खोल धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीचे आमचे सामायिक ध्येय पुढे नेण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.’ (Anthony Albanese)
२०२३ मध्ये अल्बानीज यांनी केला होता भारत दौरा
मार्च २०२३ मध्ये अल्बानीज भारताला भेट दिली होती. त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी धोरणात्मक भागीदारीअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक राहतात. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून लोकांमधील संबंधांवर नियमितपणे भर दिला आहे. (Anthony Albanese)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community