प्रीती बंड यांचा Shiv Sena प्रवेश; शिवसेना उबाठाला धक्का

89
प्रीती बंड यांचा Shiv Sena प्रवेश; शिवसेना उबाठाला धक्का
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठाच्या माजी नेत्या आणि अमरावतीच्या राजकारणातील प्रमुख चेहरा प्रीती बंड यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्षप्रवेश केला, ज्यामुळे विदर्भातील शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेना उबाठासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(हेही वाचा – IPL 2025, MI vs PBKS : ऑपरेशन सिंदूरचा असाही परिणाम; मुंबई विरुद्ध पंजाब सामना धरमशालातून हलवण्याची शक्यता)

प्रीती बंड या दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाकडून रवी राणा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाने त्यांना तिकीट नाकारले. यामुळे नाराज होऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, परंतु पक्षाने त्यांना निलंबित केले. आता, शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करत त्यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – मुसलमानांवरील हल्ल्याचा बदला घेऊ; Al Qaeda ची हिंदूंना धमकी)

प्रीती बंड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “स्थानिक नेत्यांमुळे माझे तिकीट कापले गेले. शिवसेना उबाठा माझे घर होते, पण निवडणुकीनंतर सहा महिने कोणीही संपर्क साधला नाही.” यामुळे त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) जाण्याचा निर्णय घेतला. अमरावती शहरात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनर्सही लावले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.