
-
प्रतिनिधी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीका केली आहे. दरेकर म्हणाले, “सपकाळ यांनी आधी ओळख निर्माण करावी. त्यांना कोण ओळखतं? पक्ष संघटना उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, ती पार पाडावी. पण ते संजय राऊत यांच्यासारखी पोपटपंची करत माध्यमांत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.”
(हेही वाचा – CC Road : रस्ते काँक्रिटीकरण कामात हलगर्जीपणा; कंत्राटदाराविरोधात मोठी कारवाई)
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “एका भेटीतून निष्कर्ष काढणे घाईचे आहे. दोन्ही नेते बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारधारेतून तयार झाले आहेत. ही कौटुंबिक भेट हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी पूरक ठरेल. शिंदे नगरविकास मंत्री असून, मुंबईच्या विकासावर चर्चा होऊ शकते.” उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, “उद्धव यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. त्यांनी बाळासाहेबांसारखी संघटना उभी करावी. शरद पवार यांच्यासोबत बसून तोडाफोडीचे राजकारण करत आहेत.”
(हेही वाचा – Ayushman Bharat Yojana : ४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ)
संजय राऊत यांच्यावरही दरेकरांनी (Pravin Darekar) निशाणा साधला. “हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे, ती सोडणार नाही. राऊत अपरिपक्व बोलतात. विकासावर बोला, भावनिक वाद टाळा. विशिष्ट समुदायाची तळी उचलण्यासाठी अशा समस्या निर्माण करत आहेत का?” लाडकी बहीण योजनेवर दरेकर म्हणाले, “सरकार संवेदनशील आहे. पैसे बंद होणार नाहीत, उलट वाढतील. विरोधकांना राजकीय स्वार्थासाठी योजनेची माती करायची आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community