Prakash Ambedkar : नाना पटोले, तुमच्या डोक्यात ‘लोच्या’ आहे..

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थेट सुनावले. “तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी ‘माइंड गेम’ खेळत आहात अन्यथा तुमच्या डोक्यात काहीतरी ‘लोच्या’ आहे,” अशा शब्दात काँग्रेसचे वाभाडे काढले.

184
Prakash Ambedkar : नाना पटोले, तुमच्या डोक्यात 'लोच्या' आहे..
Prakash Ambedkar : नाना पटोले, तुमच्या डोक्यात 'लोच्या' आहे..
  • सुजित महामुलकर

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना थेट सुनावले. “तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी ‘माइंड गेम’ (mind game) खेळत आहात अन्यथा तुमच्या डोक्यात काहीतरी ‘लोच्या’ आहे,” अशा शब्दात काँग्रेसचे वाभाडे काढले. (Prakash Ambedkar)

वंचितला ऐनवेळी निमंत्रण

काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्यात जोरदार ‘पत्र-युद्ध’ सुरु झाले असून समाजमाध्यमांवर हा पत्रव्यवहार सुरु आहे. आज गुरुवारी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक ३ वाजता दक्षिण मुंबईत हॉटेल ट्रायडंट (Hotel Trident) येथे ठरलेली होती. दुपारी १ वाजेपर्यंत वंचितला कोणत्याही प्रकारे निमंत्रण गेले नव्हते. त्यानंतर १.१० वाजता पटोले यांनी पटोले, राष्ट्रवादीचे (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) आणि शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सहीचे एक पत्र ‘X’ पोस्ट केले. या पत्रातून वंचित ला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. (Prakash Ambedkar)

तुम्हाला अधिकार दिले आहेत का?

त्यावर संतापलेल्या आंबेडकर यांनी या पत्राला खरमरीत उत्तर देत पटोले यांना पत्र लिहिले. या पत्रातून आंबेडकर यांनी ‘तुमच्या डोक्यात लोच्या आहे’, असे म्हटले. “महाराष्ट्रातील आघाडीबाबत निर्णय घेण्याचा आधिकार कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकरिणीने किंवा हाय-कमांडने तुम्हाला दिले आहेत का? असा थेट सवाल पटोले यांना केला. (Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Republic Day 2024 : ‘शिवराज्याभिषेक’ संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ)

तरी तुम्हीच तुमच्या सहीचे निमंत्रण पत्र पोस्ट कसे काय करता?”

तसेच “कॉँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी बोलताना स्पष्ट केले होते की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर वंचितचा महाविकास आघाडीत समावेश केला जाईल. तेव्हा तुम्ही त्यांच्या शेजारी बसलेला होतात आणि तरी तुम्हीच तुमच्या सहीचे निमंत्रण पत्र पोस्ट कसे काय करता?” अशी विचारणा केली. (Prakash Ambedkar)

यापैकी एकाने आमंत्रित केले तर..

आंबेडकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, “महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा या तीनही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला यायला हवे. अथवा कॉँग्रेसकडून रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala), राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) किंवा मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यापैकी एकाने आमंत्रित केले तर आम्ही बैठकीला विनासंकोच येऊ,” अशी अट आंबेडकरांनी कॉँग्रेसला घातली. (Prakash Ambedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.