डॉ. आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या आव्हाडांना Prakash Ambedkar यांनी सुनावले; ‘असा दिखावा उपयोगाचा नाही’

309
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर  स्टंटबाजीच्या नादात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, हा दिखावा असल्याची टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. तसेच “असा दिखावा काही उपयोगाचा नाही, अशा शब्दांत सुनावले.

‘काय करत आहात, याचे भानच नाही’

‘हिंदुस्तान पोस्ट’शी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “मनुस्मृति अजून मनातून गेलेली नाही. त्यामुळे फिजिकल फॉर्ममध्ये फोटो फाडून काय उपयोग आहे. आपण काय करतो आहोत, याचे काहींना भानच राहत नाही  त्यामुळे हा दिखावा उपयोगाचा नाही. मनुस्मृतीचे अनुकरण न करणे, हे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली.

मिटकरी यांची टीका

जितेंद्र आव्हाड यांनी रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर आंदोलन करत ‘मनुस्मृती’चे दहन केले. हा स्टंट करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. याचा सर्वच स्तरतून निषेध व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आव्हाडांवर टीका केली आहे तसेच ‘X’ या समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करत जाहीर निषेध केला.

आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी

 “जाहीर निषेध! जाहीर निषेध ! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी,” असे मिटकरी यांनी ‘X’  वर म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.