Muslim : संस्कृत विद्यापीठाजवळील सरकारी जमिनीवर बेकायदा मजार पाडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर मुसलमानांचा हल्ला

गेल्या महिन्यात मे 2023 मध्ये या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने हरिद्वारच्या डीएमला पत्र लिहून ही मजार हटवण्याची मागणी केली होती.

154

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या एका अवैध मजारीला हटवण्यासाठी प्रशासनाला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाजवळील ही मजार हटवल्याची बातमी ऐकून अनेक मुस्लिमांनी गोंधळ घातला. जमावाने केलेल्या गोंधळामुळे रस्त्यावरील वाहनांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही घटना सोमवारी १२ जून २०२३ रोजी घडली आहे.

हे प्रकरण बहादराबाद पोलीस स्टेशन परिसरातील आहे. ही मजार कॅनॉल ट्रॅकजवळ बांधण्यात आली होती. त्याचे नाव सय्यद बाबा रोशन अली शाह होते. ही मजार उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाजवळ बांधण्यात आली होती. गेल्या महिन्यात मे 2023 मध्ये या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने हरिद्वारच्या डीएमला पत्र लिहून ही मजार हटवण्याची मागणी केली होती. तेव्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सागर खेमरिया यांनी मजारीच्या जवळ लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे सांगितले होते. अनूप यदुवंशी यांच्या म्हणण्यानुसार हळूहळू त्या मजारीला समाधीला मशिदीचे स्वरूप दिले जात आहे.

(हेही वाचा Love Jihad : अनामिका झाली ‘फातिमा’; कुटुंबियांनी केले पिंडदान )

विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली. सोमवारी १२ जून २०२३ रोजी ही मजार पाडण्यासाठी बुलडोझर चालविण्यात आला. ही मजार अल्पावधीतच पाडण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईची माहिती मुस्लिम समाजातील लोकांना समजताच ते रस्त्यावर उतरले. अनेक जण जमावाच्या स्वरूपात घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर बांधलेल्या या मजारीवर बोलावून जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाच्या बोलण्याचा जमावावर काहीही परिणाम झाला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.