PM Narendra Modi हे ६ जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर; जागतील सर्वात मोठ्या पुलाचे करणार उद्घाटन

71
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (६ जून) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलाचे उद्घाटन (Chenab Bridge Inauguration) करणार आहेत. तसेच श्रीनगर ते जम्मूमधील कटरा यांना जोडणाऱ्या दोन खास डिझाइन केलेल्या वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवतील, अशी  माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी केली. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Natural Disaster Relief : आपत्तीग्रस्तांना दिलासा! ४९ कोटींचा निधी मंजूर; विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश)

केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आणि म्हटले की, “इतिहास घडत आहे… फक्त ३ दिवस बाकी आहेत! जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, शक्तिशाली चिनाब पूल, जम्मू आणि काश्मीरमध्ये उंच उभा आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) चा एक भाग. निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधलेला. पंतप्रधान मोदी ६ जून २०२५ रोजी चिनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन भारताच्या ताकदीचे आणि दृष्टिकोनाचे अभिमानास्पद प्रतीक!’ आहे असे विधान एक्सच्या माध्यमातून केले आहे.
या रेल्वे लिंकचे उद्घाटन सुरुवातीला १९ एप्रिल २०२५ रोजी होणार होते, परंतु अतिपाऊस आणि बर्फवृष्टीसह प्रतिकूल हवामान नसल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. दरम्यान, ६ जून रोजी होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या (३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२५) अनुरूप हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, कारण रेल्वे लिंकमुळे यात्रेकरूंचा प्रवास सुलभ होईल.
(हेही वाचा – Monsoon Session : २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा मुद्दा संसदेत गाजणार?)
माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ६ जून रोजी रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलावर (Chenab Bridge) पाहणीसाठी जाण्यापूर्वी उधमपूर येथे उतरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकावर पोहोचतील आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील – एक कटरा ते बारामुल्ला आणि दुसरी बारामुल्ला ते कटरा अशी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला जाईल.  या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav), केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.