दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवणाऱ्या खासदारांना PM Narendra Modi भेटणार

54

PM Narendra Modi : दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी ३३ देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या विविध पक्षीय खासदारांच्या सात शिष्टमंडळातील सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात भेट घेणार आहेत. येत्या नऊ किंवा दहा तारखेला ही भेट होण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळातील (Indian delegation Team) सदस्य परदेशातील अनुभव सांगणार आहेत. चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व शिष्टमंडळे मायदेशी परतणार आहेत. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Northeast flood: ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे कहर! ३६ जणांचा मृत्यू, लाखो बेघर)

दहशतवादाला खतपाणी घालत असलेल्या पाकिस्तानचे (Pakistan) खरे स्वरूप जगासमोर मांडण्यासाठी त्यानंतर केंद्र सरकारने सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांची स्थापना करीत ही शिष्टमंडळ रवाना केली. खासदारांचे शिष्टमंडळ मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान मोदी हे शिष्टमंडळातील सदस्यांकडून त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती घेतील. खासदारांना आलेले अनुभव जाणून घेत सरकार पुढील रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.