पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला केला. त्यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचे समजल्यावरच त्यांना ठार केले. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. त्यावर पाकिस्तानने भारतावर उलटवार केले. त्यावर भारताने ७ आणि ८ मे हे दोन दिवस पाकिस्तानवर असे हल्ले केले की, पाकिस्तान पुरता उद्धवस्त झाला. त्यानंतर पाकिस्तान भारतासमोर शरणागती पत्करून शास्त्रसंधीसाठी आर्जव केली. या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रथमच सोमवार, १२ मे रोजी देशवासियांना संबोधित केले.
…तर असा पोलादी निर्णय घेतले जातात
आमच्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर मिटवण्याची किंमत दहशतवाद्यांना कळली असेल, सिंदूर ऑपरेशन हे कोट्यवधी भारतवासीयांच्या भावनांचे प्रतीक आहे, हे ऑपरेशन न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजीची रात्र आणि ७ मे रोजीची सकाळ जगाने ही प्रतिज्ञा परिणामांमध्ये बदलल्याचे पाहिले आहे. भारतीय सैन्याने दहशतवादाच्या तळांवर अचूक मारा केला आहे. दहशतवाद्यांनी स्वप्नातही अशा हल्ल्याचा अविचार केला नसेल. राष्ट्र प्रथम भावना असेल तर असा पोलादी निर्णय घेतला जातो, जेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होत होते तेव्हा दहशतवाद्यांच्या थरकाप उडाला होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा भारताच्या कारवाईचा लष्करप्रमुख Asim Munirने घेतला धसका, घाबरलेल्या मुनीरला बंकरमध्ये लपविलं)
पाकिस्तानातील दहशतवादी तळांना खिंडार पडले
जगात जिथे कुठे दहशतवादी हल्ले झाले त्यांचे कोणते ना कोणते संबंध पाकिस्तानातील दहशतवादी तळांशी जोडलेले होते. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांचे म्होरके उघडपणे पाकिस्तानात फिरत होते, त्यांना भारताने एका झटक्यात संपवले आहे. भारताच्या कारवाईने पाकिस्तान घोर निराशेत गेला आणि त्यातूनच त्याने आणखी एक दुस्सासन केले. पाकिस्तानने भारतावरच पलटवारकेले. प्रार्थना स्थळे, शाळा, नागरी वस्त्यांवर हल्ले केले, त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानची तयारी सीमेवर हल्ला करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छाताडावर हल्ला केला. पाकिस्तानच्या वायुसेनेचे एअर बस नष्ट केले, ज्यावर पाकिस्तानला अभिमान वाटत होता. पहिल्या तीन दिवसांतच भारताने पाकिस्तानला इतके उद्धवस्त केले ज्याची त्याने कल्पनासुद्धा केली नव्हती. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वतःच्या बचावासाठी जगभर फिरून हात जोडू लागला. अखेर १० मे रोजी पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओला संपर्क केला, तोवर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना खिंडार पाडले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
अणू हल्ल्याचे ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
जेव्हा पाकिस्तानच्या वतीने आम्हाला विनंती केली गेली आणि यापुढे सैन्य कारवाई करणार नाही, हे आम्ही ठरवले. पण लक्षात घ्या भारताने निर्णय घेतला आहे, भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केले आहे. भारताने सैन्य कारवाई केवळ स्थगित केली आहे. भविष्यात आम्ही पाकिस्तानची प्रत्येक कृती याच कसोटीवर पडताळणार आहोत. आमच्या सैन्याची तिन्ही दले कायम सतर्क असणार आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी लढ्यात नवीन परिमाण आखले आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर तोडीस तोड उत्तर देणार. कोणत्याही अणू हल्ल्याची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, या अशा धमक्यांच्या आडून दहशतवादी कारवाया सहन करणार नाही. आम्ही दहशतवादाला पोसणारे सरकार आणि दहशतवादी यांच्यात फरक करणार नाही. भारताने ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या जनाजाला पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आणि राज्यकर्ते उपस्थित होते हे सरकार पुरस्कृत दहशतवादाचे उदाहरण होते, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा Pakistan च्या गुप्तचर संघटनेची कुरघोडी, भारताच्या व्हॉटस्अप नंबरवरून मिळवतात संवेदनशील माहिती)
टेरर आणि टॉक सोबत होणार नाही
भारतीय सैन्याने वाळवंटात आणि डोंगराळ भागात उत्तम काम केले. ऑपरेशन सिंदूरध्ये भारताच्या मेड इन इंडिया संरक्षण शस्त्रास्त्रांची क्षमता पाहिली. आपली एकता आपली मोठी शक्ती आहे. हे युग जसे युद्धाचे नाही, तसे हे युग दहशतवादाचेही नाही. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार ज्याप्रकाने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, एक दिवस ते पाकिस्तानचा समूळ नाश करतील. पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्यांना दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाही, तसेच पाणी आणि खून एक एकत्र वाहू शकत नाही, आम्ही जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवाद आणि पीओके वरच होईल, असा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगत आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने शांतीचा मार्ग दाखवला पण शांतीचा मार्गही शक्तीने जातो. मानवता शांती आणि समृद्दीच्या दिशेने जावी, यासाठी भारत विकसित व्हावा म्हणून भारताने शक्तिशाली होणे गरजेचे आहे. मागील दिवसांत भारताने हेच केले आहे. भारतीय सैन्याला मी सॅल्यूट करतो, भारतवासीयांच्या एकजुटतेला नमन करतो, असे शेवटी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community