PM Narendra Modi : विचारपूर्वक बोला, वाद टाळा; पंतप्रधान मोदींनी दिल्या सर्व भाजपा नेत्यांना सूचना

भाजपा आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्राच्या उपलब्धी आणि विकास योजनांवर भर देणार आहे. याबाबत मंत्रिपरिषदेच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि गेल्या ५ वर्षातील कामगिरीवर चर्चा करण्यात आली.

137
PM Narendra Modi : विचारपूर्वक बोला, वाद टाळा; पंतप्रधान मोदींनी दिल्या सर्व भाजपा नेत्यांना सूचना

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच रविवार ३ मार्च रोजी दिल्लीत भाजपच्या मंत्री परिषदेची बैठक झाली. ही बैठक तब्बल ८ तास चालली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला. तसेच, डीपफेक व्हिडिओ आणि ऑडियोपासून सावध राहण्यासही सांगितले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक, लोकसभेचे जागावाटप अंतिम करणार)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की; “वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कोणालाही भेटताना विचारपूर्कव भेटा, विचारपूर्कव बोला. तुम्हाला बोलायचे असेल तर सरकारच्या योजनांवर बोला. सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही सरकारने केलेल्या विकासकामांचा जनतेसमोर उल्लेख करा.”

विकसित भारत २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा :

यावेळी मंत्रिपरिषदेने विकसित भारत २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंट आणि पुढील ५ वर्षांच्या सविस्तर कृती आराखड्यावर चर्चा केली. तसेच मे २०२४ मध्ये नवीन सरकारच्या स्थापनेनंतर त्वरित अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यासाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार करण्यात आला. विकसित भारताचा रोडमॅप हा २ वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यामध्ये सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक संस्थांशी व्यापक सल्लामसलत आणि तरुणांना त्यांची मते, सूचना आणि इनपुट जाणून घेण्यासाठी एकत्रित करणे यांचा समावेश असलेल्या संपूर्ण-सरकारी दृष्टिकोनाचा समावेश होता. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Viksit Bharat @2047: मंत्रिमंडळ बैठकीत विकसित २०४७ च्या व्हिजनवर चर्चा, मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटची बैठक संपन्न)

कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना :

पुढे बोलताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की; यावर्षी जूनमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प हा विकसित भारत दर्शवणारा असला पाहिजे. २०४७ पर्यंत भारत विकसित देश कसा बनू शकतो, याविषयी सचिवांनी पंतप्रधानांना कल्पना दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू, अर्जुन मेघवाल आणि पियुष गोयल यांनी या कल्पनेवर पंतप्रधान मोदींकडे आपल्या सूचना मांडल्या. भाजपा आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्राच्या उपलब्धी आणि विकास योजनांवर भर देणार आहे. याबाबत मंत्रिपरिषदेच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि गेल्या ५ वर्षातील कामगिरीवर चर्चा करण्यात आली. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.