PM Narendra Modi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आमच्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर मिटवणाऱ्या दहशतवाद्यांना भारताच्या ताकदीची कल्पना आली असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट इशाराच दिला. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानPM Narendra Modi म्हणाले, दहशतवादाला पोसणारे पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी यांना एकाच नजरेत बघणार असा संदेश अवघ्या जगाला यानिमित्ताने पंतप्रधानांनी दिला.
दरम्यान, सिंदूर ऑपरेशन हे कोट्यवधी भारतवासीयांच्या भावनांचे प्रतीक असून ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना नमूद केले. दि. ०६ मे रोजीची रात्र आणि दि. ०७ मे रोजीची सकाळ जगाने ही प्रतिज्ञा परिणामांमध्ये बदलल्याचे पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने दहशतवादाच्या तळांवर अचूक मारा केला आहे, असेही PM Narendra Modi म्हणाले.
(हेही वाचा चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेच्या मुद्यावरच; PM Narendra Modi यांची परखड भूमिका )
ते पुढे म्हणाले, दहशतवाद्यांनी स्वप्नातही अशा हल्ल्याचा विचार केला नसेल. असे सांगतानाच राष्ट्र प्रथम भावना असेल तर असा पोलादी निर्णय घेतला जातो. जेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होत होते तेव्हा दहशतवाद्यांचा थरकाप उडाला होता, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
भारताच्या हवाई हल्ल्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांचे म्होरके उघडपणे पाकिस्तानात फिरत होते, त्यांना भारताने एका झटक्यात संपवले आहे. भारताच्या कारवाईने पाकिस्तान घोर निराशेत गेला आणि त्यातूनच पाकिस्तानने भारतावरच पलटवार केले. प्रार्थना स्थळे, शाळा, नागरी वस्त्यांवर हल्ले केले, त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.PM Narendra Modi
Join Our WhatsApp Community