ते पुढे म्हणाले, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतीय सैन्य यापुढे कारवाई करणार नाही, हे आम्ही ठरविले असे सांगतानाच पण लक्षात घ्या भारताने निर्णय घेतला असून आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केले आहे. तसेच, भारतीय सैन्याने केवळ कारवाई स्थगित केली असून आगामी काळात पाकिस्तानची प्रत्येक दहशतवादी कृती याच कसोटीवर पडताळली जाणार आहे, असेही यावेळी पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
(हेही वाचा चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेच्या मुद्यावरच; PM Narendra Modi यांची परखड भूमिका )
भारताने ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या जनाजाला पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आणि राज्यकर्ते उपस्थित होते हे सरकार पुरस्कृत दहशतवादाचे उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदींनी अवघ्या जगासमोर सांगितले. भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ०९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचबरोबर, पाकिस्तानमधील १०० दहशतवादी ठार करण्यात आले असून बहावलपूर, मुरीदके यांसारख्या मुख्य दहशतवादी ठिकाणांवर भारताने हवाई हल्ले करून नष्ट केले. PM Narendra Modi