PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत

PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत

110
PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत
PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत

जम्मूमध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी तिरंगा फडकावून केले. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी आणि पूल बांधणाऱ्या कामगारांची भेट घेतली. पंतप्रधान कटरा रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी काश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. (PM Narendra Modi)

अंजी खाडवर बांधलेला पूल हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. हा पूल नदीच्या पात्रापासून ३३१ मीटर उंचीवर बांधला गेला आहे. त्याला आधार देण्यासाठी १०८६ फूट उंच टॉवर बांधण्यात आला आहे, जो ७७ मजली इमारतीइतका उंच आहे. हा पूल रियासी जिल्ह्याला कटराशी जोडणाऱ्या अंजी नदीवर बांधला गेला आहे. या पुलाची लांबी ७२५.५ मीटर आहे. यापैकी ४७२.२५ मीटर केबल्सवर आधारलेला आहे. (PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदींनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पावरील प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. पंतप्रधानांनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांशीही संवाद साधला. (PM Narendra Modi)

७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील. ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आहे. सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.