अधिका-यांसोबत किती वेळा केले सहभोजन? मोदींनी मंत्र्यांकडून मागवली माहिती

80

केंद्रीय मंत्र्यांकडून योग्य काम होत आहे की नाही यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कायमंच बारीक नजर असते. त्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांना विविध सूचना देखील करण्यात येतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून आपल्या कामाचा अहवाल मागवला आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही, याबाबतची माहिती पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांकडून मागवली आहे.

केंद्रीय मंत्रालये आणि त्यांच्या विभागांकडून विविध मुद्द्यांवर उत्तरे मागवण्यात आली आहेत. सरकारी ई-मार्केट(GeM)पोर्टल,अधिका-यांसोबत सहभोजन करणे किंवा बैठका घेणे आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी करणे यांसारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

(हेही वाचाः राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची यादी तयार?शिंदे गटातून यांना मिळणार संधी)

मोदींनी मागवला अहवाल

मंत्री परिषदेत सूसुत्रता आणून कार्यक्षमता वाढवणे आणि योग्य प्रशासनाच्या माध्यमातून कामाला गती प्राप्त करुन देणे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी होऊन कार्यवाही करण्यात येत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी मोदींनी हा अहवाल मागवला आहे.

टिफिन मीटिंगची संकल्पना

प्रशासन आणि सरकार यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘टिफिन मीटिंग’ची संकल्पना राबवली होती. यामध्ये अधिका-यांसोबत मंत्री सहभोजन करत असत व आपले विचारही मांडत असत. अशीच संकल्पना मोदींनी काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारमध्येही राबवली माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

तसेच जिओटॅगिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन भ्रष्टाचारास आळा घालण्याचा संदेशही मोदींनी दिला होता. तसेच तक्रार निवारण यंत्रणेचा तपशीलही मोदींनी मंत्र्यांकडून मागवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.