काँग्रेसचा इतिहास दहशतवादाच्या तुष्टीकरणाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

148
काँग्रेसचा इतिहास दहशतवादाच्या तुष्टीकरणाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेसचा इतिहास दहशतवादाच्या तुष्टीकरणाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसचा इतिहास हा दहशतवाद आणि दहतवादाच्या तुष्टीकरणाचा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली, तेव्हा दहशतवाद्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक झाल्यावर काँग्रेसने देशाच्या सैन्यदलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसची वॉरंटी संपली आहे, काँग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अशा परिस्थितीत वॉरंटीशिवाय काँग्रेसची गॅरंटी सुद्धा तितकीच खोटी आहे आणि खोट्या गॅरंटीचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड खूप जुना असल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

कर्नाटकच्या जनतेला काँग्रेस आणि जेडीएस या दोघांपासून सावध राहावे लागेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस आणि जेडीएस हे दिसायला दोन पक्ष आहेत, पण ते दोघेही मनापासून आणि कृतीने सारखेच आहेत. दोघेही कुटुंबवादी आहेत, दोघेही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात आणि दोघेही समाजात फूट पाडण्याचे राजकारण करतात. कर्नाटकच्या विकासाला या दोन्ही पक्षांचे प्राधान्य नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काल’मधील कर्नाटकची ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक कर्नाटकला नंबर वन राज्य बनवण्याची निवडणूक आहे. येत्या २५ वर्षात कर्नाटक विकासाच्या कोणत्या उंचीवर जाईल, हे ही निवडणूक ठरवेल. आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

(हेही वाचा – Sharad Pawar : पक्षाच्या अध्यक्षपदावरील निर्णयावर शरद पवार २-३ दिवसांत अंतिम निर्णय घेणार)

यासोबतच काँग्रेस-जेडीएसच्या चुकीच्या कारभाराचा पुरावा म्हणजे अप्पर भद्रा सिंचन प्रकल्प. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नव्हती, म्हणून त्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या विकासकामांशी काँग्रेस कधीही स्पर्धा करू शकत नाही. २०१४ पूर्वी काँग्रेसने १० वर्षांत जेवढी वैद्यकीय महाविद्यालये बांधली, भाजप सरकारने केवळ ९ वर्षांत दुप्पट वैद्यकीय महाविद्यालये बांधल्याचे मोदींनी सांगितले. भाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, आज मी राज्य भाजपच्या टीमचे आणि कर्नाटक भाजपच्या नेतृत्वाचे जाहीर अभिनंदन करतो. काल त्यांनी जे संकल्प पत्र जाहीर केले आहे, ते अतिशय चांगले संकल्प पत्र घेऊन आले आहेत. त्यात कर्नाटकला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा रोड मॅप आहे, त्यात आधुनिक पायाभूत सुविधांची ब्लू प्रिंट आहे, त्यात महिलांच्या सक्षमीकरणावर भर असल्याचे मोदी यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.