PM Modi Visits Cyprus : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान; दोन्ही देशांत व्यापारवाढीस चालना मिळणार

PM Modi Visits Cyprus : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय सायप्रस दौऱ्या(PM Modi Visits Cyprus)वर असून राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधानांना सन्मान प्रदान केला. या दौऱ्यात(PM Modi Visits Cyprus) साप्रयसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला.

65

PM Modi Visits Cyprus : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय सायप्रस दौऱ्या(PM Modi Visits Cyprus)वर असून राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधानांना सन्मान प्रदान केला. या दौऱ्यात(PM Modi Visits Cyprus) साप्रयसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला. या सन्मानानंतर पंतप्रधानांनी भारत व सायप्रसमधील भागीदारी मजबूत आणि विविधीकरण करण्याच्या नवीन वचनबद्धता म्हणून हा सन्मान स्वीकारल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, भारत-ग्रीस-सायप्रस व्यवसाय व गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून नौवहन, दळणवळण-वाहतूक, नवीकरणीय ऊर्जा, नागरी विमान वाहतूक व डिजिटल सेवा यासारख्या क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्याला चालना मिळणार आहे. (PM Modi Visits Cyprus)

(हेही वाचा PM Narendra Modi सायप्रस दौऱ्यावर; मुसलमानांचा ‘खलीफा’ बनू पाहणाऱ्या तुर्कीला जोरदार धक्का )

दरम्यान, भारतासाठी विशेषतः परकीय थेट गुंतवणूक क्षेत्रात सायप्रस हा प्रमुख आर्थिक भागीदार राहिलेला आहे. असे सांगतानाच भारतीय अर्थव्यवस्थेत नवीन गुंतवणुक करण्यासाठी असलेल्या सायप्रसच्या उत्सुकतेचे पंतप्रधानां(PM Modi Visits Cyprus)नी स्वागतही केले. विशेष म्हणजे, सायप्रस पुढील वर्षी युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणार असून या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत धोरणात्मक भागीदारी अधिक वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, वर्षअखेरीस भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात व्यापार करार पूर्ण करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

(हेही वाचा Maval Bridge Collapse प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा मुख्यमंत्र्यांना फोन )

भारत व सायप्रस यांच्यातील व्यापार व आर्थिक सहकार्याला मोठा चालना मिळणार असून गोलमेज बैठकीतील व्यावहारिक सूचना धोरणात्मक क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य मजबूत करणाऱ्या आराखड्यासाठी आधार बनतील, असेही पंतप्रधान मोदीं(PM Modi Visits Cyprus)नी अधोरेखित केले. मागील ११ वर्षात भारतात झालेल्या आर्थिक परिवर्तनाला अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले, भावी पिढीतील सुधारणा, धोरणात्मक अंदाज, स्थिर राजकारण व व्यापार सुलभतेमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी सायप्रस दौऱ्यात व्यक्त केला.

सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मानानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना

१४० कोटी भारतीयांच्या वतीने सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदीं(PM Modi Visits Cyprus)नी राष्ट्रपती, सरकार व सायप्रसच्या जनतेचे मनापासून आभार मानले. पंतप्रधान म्हणाले, हा पुरस्कार भारत आणि सायप्रसमधील दीर्घकालीन संबंधांना समर्पित केला. जे सामायिक मूल्यांवर व परस्पर विश्वासावर वृध्दींगत झाले आहेत. सर्वोच्च पुरस्कार भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग एक कुटुंब आहे’ या प्राचीन तत्वज्ञानाची ओळख आहे. यामाध्यमातून जागतिक शांतता व प्रगतीसाठी हा दृष्टिकोन मार्गदर्शक ठरेल.(PM Modi Visits Cyprus)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.