पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष Santiago Pena Palacios भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले, “विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद…”

Paraguayan President भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले, "विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद..."

55
पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष Santiago Pena Palacios भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले,
पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष Santiago Pena Palacios भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले, "विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद..."

पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (Santiago Peña Palacios) सँटियागो पेना पॅलासिओस २ ते ४ जून दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत. सॅंटियागो पेना पॅलासिओस यांनी आज दुपारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तत्पूर्वी, राष्ट्रपती पेना यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली. ही बैठक दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये झाली. या काळात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय पातळीवरील चर्चाही झाल्या. (Santiago Peña Palacios)

 

पॅराग्वेच्या राष्ट्रप्रमुखांचा दुसरा भारत दौरा आहे. त्यांचे विमान नवी दिल्लीतील पालम एअर फोर्स स्टेशनवर उतरले. येथे त्यांचे गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष पेना आज उपाध्यक्ष जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन देखील करतील. (Santiago Peña Palacios)

 

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमच्या भेटीमुळे परस्पर संबंधांमध्ये विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद मिळेल असा मला विश्वास आहे. यामुळे भारत-लॅटिन अमेरिका संबंधांमध्ये नवीन आयाम देखील येतील. गेल्या वर्षी, मी गयाना येथे झालेल्या कॅरिकॉम शिखर परिषदेला उपस्थित राहिलो होतो, जिथे आम्ही विविध मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. आपण या सर्व क्षेत्रात पॅराग्वे आणि सर्व लॅटिन अमेरिकन देशांसोबत एकत्र काम करू शकतो.” (Santiago Peña Palacios)

हेही वाचा- Viral Video : “चलो, तुम हनुमान चालीसा पढ़ो अब”, कॉमेडिय गौरव गुप्ताने पाकिस्तानी चाहत्याला लाईव्ह शोमध्ये केलं रोस्ट ; काश्मीरच्या मुद्द्यावर म्हणाला …

दिल्लीनंतर ते ४ जून रोजी मुंबईला येणार आहेत. येथे ते राज्यातील नेते, उद्योजक, नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख लोकांशी संवाद साधतील. त्यांच्या भेटीबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालय आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. (Santiago Peña Palacios)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.