मुसलमानांची वाहवा करणाऱ्या BBC ला येतोय मुसलमानांच्या धर्मांधतेचा अनुभव

100

यूकेची सरकारी मीडिया संस्था BBC अनेकदा इस्लामिक कट्टरतावादी आणि दहशतवादी यांची वाहवा करत असते. आता हेच धर्मांध मुसलमान BBCच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत आहेत. केवळ लंडनच नाही तर स्कॉटलंडमध्येही शेकडो धर्मांध मुसलमान BBCच्या कार्यालयाबाहेर पोस्टर आणि बॅनर घेऊन जमले होते. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील पॅसिफिक क्वे येथील बीबीसी कार्यालयाबाहेर गोंधळाचे वातावरण होते. त्याचप्रमाणे एडिनबर्ग रेल्वे स्टेशनही कट्टरवाद्यांनी ताब्यात घेतले होते.

सर्वप्रथम हमास समर्थकांनी ग्लासगोचे मध्य रेल्वे स्थानक ताब्यात घेतले. त्यानंतर जमाव BBC च्या स्टुडिओकडे सरकला. आंदोलकांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारवर ‘नरसंहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा’ आरोप केला. त्यांनी पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी आणि युद्धबंदीच्या घोषणा दिल्या. त्यांनी इस्रायलला ‘दहशतवादी देश’ असेही संबोधले. इस्रायलने गाझामध्ये जमिनीवर हल्लेही तीव्र केले असून लष्कर आतपर्यंत घुसले आहे.

(हेही वाचा : Israel- Palestine Conflict : गाझाच्या मशिदींवर इस्रायलचे हल्ले; UNने म्हटले- तिथे एकही जागा सुरक्षित नाही)

यासोबतच हमास समर्थक जमावाने बीबीसी कार्यालयाबाहेर अनेक शव पिशव्या टाकल्या. या पिशव्यांचा उपयोग मृतदेह ठेवण्यासाठी केला जातो. या निदर्शनात महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आंदोलकांची संख्या 300 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लंडनमध्येही ऑक्सफर्ड सर्कस आणि बीबीसीच्या कार्यालयाबाहेर हजारोंची गर्दी जमली होती. आंदोलकांमधील एका महिलेने तर ब्रिटिश पोलिसांना ‘डुक्कर’ म्हटले. पोलिस ‘हराम’ असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेल्या नरसंहारासाठी इस्रायली सरकारला जबाबदार धरले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.