
जम्मू-काश्मीर पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ‘टेरर फॅक्टरी’ची (Pakistan ‘Terror Factory’) धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनीने समोर आणली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करतायत, असं समोर आलं आहे. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती केली जात असल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान, पाकिस्तान “द डर्टी डझन” चित्रपटाप्रमाणे कुरघोड्या करत आहे, असे दिसते. (Pakistan ‘Terror Factory’)
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. (Pakistan ‘Terror Factory’)
भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार
दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधीही आला काश्मिरात होता. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते. याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आहे. (Pakistan ‘Terror Factory’)
फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती
ऑगस्ट 2024 मध्ये, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेच्या तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करताना झहीर अहमद अब्बास नावाच्या दहशतवाद्याला ठार मारले होते. त्यानंतर तपासात असे दिसून आले की झहीर अहमद अब्बासला यापूर्वी रावळपिंडी मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते. झहीर अहमद अब्बासला एका फौजदारी खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. पण पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने झहीरला तुरुंगातून सोडले, त्याला जिहादी बनवले आणि भारतात दहशत पसरवण्यासाठी पाठवले. रावळपिंडी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी स्वतः झहीर अहमद अब्बासच्या फाशीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती. (Pakistan ‘Terror Factory’)
चित्रपट “द डर्टी डझन” काय आहे ?
“द डर्टी डझन” हा १९६७ साली प्रदर्शित झालेला अमेरिकन युद्धपट आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कथा सुरू होते मेजर जॉन रायस्मन (ली मार्विन) या अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यापासून. त्याला एक अवघड काम दिले जाते. जर्मनीत असलेल्या नाझी अधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकस्थळावर हल्ला करणे. हे ठिकाण एक प्रकारचे नाझी अधिकाऱ्यांचे विश्रांतीगृह आहे, जिथे उच्चपदस्थ अधिकारी एकत्र येतात. या मिशनचा उद्देश म्हणजे या अधिकार्यांना ठार करून जर्मन सैन्याची कमान कमकुवत करणे असते. (Pakistan ‘Terror Factory’)
परंतु हे मिशन इतके धोकादायक असते की, कोणत्याही नियमित सैनिकांना ते देणे शक्य नसते. त्यामुळे रायस्मन एक वेगळा मार्ग निवडतो. मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या किंवा दीर्घकालीन कारावासात असलेल्या १२ गुन्हेगार सैनिकांची निवड करतो. शेवटी ते सर्वजण मिशनसाठी जर्मनीमध्ये उतरतात. ही मोहीम अत्यंत थरारक आणि रक्तरंजित असते. त्यांनी नाझी अधिकाऱ्यांच्या निवासस्थळी बॉम्ब लावून मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला. पण ही मोहीम पूर्ण करताना अनेक सदस्य मृत्युमुखी पडतात. थोडकेच सैनिक परत जिवंत येतात. (Pakistan ‘Terror Factory’)
कोण आहे हाशिम मुसा?
हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान हा पाकिस्तानी नागरिक आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मूसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मिळून मूसाने पहलगाम दहशतवादी हल्ला प्रत्यक्षात आणला. हाशिम मूसाला लश्कर-ए-तैयबाने प्रशिक्षण देऊन कश्मीरला पाठवलं होतं. मूसाने इथे येऊन तीन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने संपूर्ण घटना प्रत्यक्षात आणली अशी माहिती सूत्रांनी दिली. हाशिम मुसा एक ते दीड वर्षांपूर्वी पूंछ-राजौरी सेक्टरमधून भारतात आला. २०२३ मध्ये पूंछ-राजौरीमध्ये भारतीय सैनिकांवरच्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. (Pakistan ‘Terror Factory’)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community