मध्य पूर्वेतील व्यापक संघर्षाच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी पाकिस्तानला बिनशर्त धोरणात्मक आणि लष्करी सहकार्य मागितल्याचे वृत्त आहे. ‘जर अमेरिकाने (America) इराणसोबत युद्ध केले तर आम्हाला पाकिस्तान आमच्या बाजूने हवा आहे,’ असे वॉशिंग्टनमधील एका वरिष्ठ राजनैतिक सूत्राने सीएनएन-न्यूज१८ ला सांगितले. यामध्ये पाकिस्तानी हवाई तळांवर प्रवेश, जमिनीवर लॉजिस्टिक सपोर्ट आणि शक्यतो नौदल मार्गांचा समावेश असल्याचे कथितपणे म्हटले आहे. ज्यामुळे पाकिस्तानला एक प्रमुख प्रादेशिक खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.
भोजनानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले, ‘पाकिस्तान इराणला बहुतेकांपेक्षा चांगले ओळखतो. जे घडत आहे त्यावर ते खूश नाहीत. ते इस्रायलशीही वाईट नाहीत. ते दोन्ही बाजूंना ओळखतात.’ त्यांनी पुढे म्हटले की मुनीरला ‘त्यातील हितसंबंध समजले होते.’ पाकिस्तानच्या पाठिंब्याच्या बदल्यात, ट्रम्प यांनी पाचव्या पिढीतील स्टील्थ जेट आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालींसह अमेरिकन (America) संरक्षण तंत्रज्ञानात अभूतपूर्व मदत देण्याचे वचन दिले आहे. चीनसोबत पाकिस्तानच्या वाढत्या लष्करी संबंधांना धोरणात्मक प्रतिकार म्हणून पाहिले जाणाऱ्या या पॅकेजमध्ये भरीव आर्थिक मदत देखील समाविष्ट आहे.
अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानसोबत नवीन व्यापार आणि सुरक्षा करार देखील करण्याचे सुचवले आहे, ज्यात विस्तारित दहशतवादविरोधी भागीदारीचे संकेत दिले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानला या वर्षाच्या अखेरीस चिनी J-35A लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे.
चीन आणि रशियापासून पाकिस्तानचे अंतर
ट्रम्पने या संधीचा वापर करून स्पष्ट संदेश दिला आहे. इस्लामाबादने रशिया आणि चीनपासून ‘दूर’ राहावे. त्यांनी मुनीर यांना ब्रिक्ससारख्या पूर्वेकडील गटांपासून दूर राहून त्याऐवजी अमेरिकेच्या (America) नेतृत्वाखालील जागतिक सुरक्षा चौकटीशी जुळवून घेण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. अमेरिकन (America) प्रशासनाच्या जवळच्या एका सूत्राने न्यूज १८ ला सांगितले की, ‘आम्हाला आमचा जुना भागीदार परत हवा आहे.’
Join Our WhatsApp Community