पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात संघर्ष सुरूच …

पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात विचारांचे अंतर्गत युद्ध सुरूच ...

96
पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात विचारांचे अंतर्गत युद्ध सुरूच ...
पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात विचारांचे अंतर्गत युद्ध सुरूच ...

भारत आणि पाकिस्तान (Shehbaz Sharif) दरम्यान सुरु असलेला संघर्ष थांबवण्याचा निर्णय शनिवार घेण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता युद्धबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या ३ तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारतीय सैन्याने हाणून पाडले. ही माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

युद्धाच्या भीतीने घाबरला पाकिस्तान …
यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी त्यांच्या देशातील जनतेला संबोधित केले आणि भारतावर युद्धाचा आरोप केला. युद्धाच्या भीतीने भारताला युद्धबंदीचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने याला आपला विजय म्हटले. यावेळी बोलताना शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर अनेक व्यक्तिमत्त्वे आणि सहयोगी देशांचे भारतासोबत अलिकडेच झालेल्या युद्धबंदीसाठी केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले. (Shehbaz Sharif)

शाहबाज शरीफ यांचा खोटा दावा
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ (Shehbaz Sharif) पुन्हा खोटे बोलले, म्हणाले, “आपण पुन्हा एकदा शत्रूवर मात केली आहे. मी असीम मुनीर (पाकिस्तान लष्करप्रमुख) यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना सलाम करतो. पहलगाम हल्ल्याच्या बहाण्याने पाकिस्तानवर हल्ला करणे निराधार आहे. शांतताप्रिय देश म्हणून, पाकिस्तानने पहलगाम घटनेची चौकशी करण्यास सुचवलं होतं. पण भारताने कायद्याचे पालन केले नाही आणि चुकीचा मार्ग स्वीकारला. जम्मू आणि काश्मीर हा मुस्लिम संघर्ष होता आणि आहे आणि जोपर्यंत आपल्या काश्मिरी बांधवांना त्यांचे हक्क मिळत नाहीत तोपर्यंत तो तसाच राहील. भारताच्या हल्ल्यात २६ निष्पाप पाकिस्तानी नागरिक शहीद झाले आहेत. यामध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.” असा खोटा दावा शाहबाज शरीफ यांनी केला. (Shehbaz Sharif)

पाकिस्तानात सत्तापालट होणार ?
दरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्यात सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. कारण अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर शाहबाज सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे. पण त्यानंतर अशा काही हालचाली झाल्याने पाकिस्तानी सैन्याने बंड केलं की काय, अशीही चर्चा रंगली आहे. यामुळे पाकिस्तानात सत्तापालट होण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तानमध्ये आजपासून 25 वर्षापूर्वी म्हणजेच 12 ऑक्टोबर 1999 साली सत्तापालट झाली होती. (Shehbaz Sharif)

पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधान …
फेब्रुवारी 1997 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या. तेव्हा नवाज शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. त्यामुळे नवाज शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. या काळातच पाकिस्तानने अणुचाचण्या केल्या होत्या. त्या यशस्वी झाल्या. पण लष्करप्रमुख जनरल जहांगीर करामत यांच्याशी वाद झाल्याने नवाज शरीफ यांनी सूत्र परवेझ मुशर्रफ याच्या हाती दिली. पण मुशर्फ यांनी लष्करप्रमुख होताच रंग बदलला. तसेच पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवताच कारगिलवर हल्ला केला. (Shehbaz Sharif)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.