पाकचे पंतप्रधान Shahbaz Sharif म्हणाले; आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका

177
Shahbaz Sharif : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने 1960 सालचा सिंधू जलवाटप करार स्थगित (Indus treaty postponed) केला. मात्र, त्यानंतर काही आठवड्यांतच पाकिस्तानने या करारावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान केलं आहे. (Shahbaz Sharif)
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, पाकिस्तान शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे, असं शाहबाज शरीफ म्हणाले. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, असं भारताने ठणकावले आहे.

(हेही वाचा – Caste Validity Certificate सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ)

गेल्या 48 तासांत सहा दशतवाद्यांना कंठस्नान
ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir terrorist encounter) भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातले आहे. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.