Pakistan चे माणुसकीहीन वर्तन; खराब हवामानामुळे बिघडलेल्या इंडिगोच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी नाकारली 

अखेर हे विमान कसंबसं श्रीनगर विमानतळावर उतरवण्यात आले.

77

राजधानी दिल्लीपासून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानाला खराब हवामानाचा बुधवारी फटका बसला. या प्रतिकूल हवामानामुळे विमानात बिघाड झाला म्हणून या विमानातील वैमानिकाने जवळच्या पाकिस्तानातील लाहोर विमान प्राधिकरणाला संपर्क करून तेथील विमानतळावर तातडीचे लँडिंग करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मात्र पाकिस्तानने (Pakistan) विनंती नाकारली. यानिमित्ताने पाकिस्तानने माणुसकीहीन वृत्ती दाखवून दिली आहे.

या घटनेबद्दल सविस्तर निवेदनात डीजीसीएने म्हटले की, विमानातील कोणत्याही प्रवाशाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण विमानाचा पुढचा भाग म्हणजेच नोज रेडोम खराब झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळल्याच्या घटनेची डीजीसीए चौकशी करत आहेत. बुधवारी इंडिगोच्या ए ३२१ निओ विमानाच्या उड्डाण क्रमांक ६ई२१४२ ला पठाणकोजवळ तीव्र खराब हवामानाचा सामना करावा लागला. क्रूने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्गावरील खराब हवामानामुळे नॉर्दर्न एअर फोर्स कंट्रोलला डावीकडे वळण्याची विनंती केली होती. परंतु, ती मंजूर करण्यात आली नाही, असे डीजीसीएने सांगितले. खराब हवामान टाळण्यासाठी क्रू नंतर लाहोरच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पोहोचले, परंतु पाकिस्तानने (Pakistan) विनंती नाकारल्याचे डीजीसीएने सांगितले. अखेर कसंबसं हे विमान श्रीनगरला उतरवण्यात आले.

(हेही वाचा Conversion : रात्रीच्या अंधारात सुरु होते पाद्र्याकडून धर्मांतराचे कारस्थान; पोलिसांनी दोघांना केली अटक)

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानात विमानाला अचानक जोरदार धक्के बसत असल्याचे जाणवू लागले आणि त्यामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी विमानात भीतीने ओरडू लागले. लहान मुलांना काय घडतेय हे न समजल्याने तेही गोंधळून जोरदार रडू लागले. एकूणच विमानात गोंधळ निर्माण झाला. विजेमुळे विमान हादरले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.