Pakistan Flood Emergency : पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर ! मुजफ्फराबादमध्ये अचानक आला पूर

Pakistan Flood Emergency : पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर ! मुजफ्फराबादमध्ये अचानक आला पूर

140
Pakistan Flood Emergency : पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर ! मुजफ्फराबादमध्ये अचानक आला पूर
Pakistan Flood Emergency : पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर ! मुजफ्फराबादमध्ये अचानक आला पूर

पाकिस्तानच्या (Pakistan Flood Emergency) मुझफ्फराबादमध्ये झेलम नदीच्या पाण्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारतावर कोणतीही पूर्वसूचना न देता नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याचा आरोप केला आहे. यामुळे हट्टियन बाला परिसरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. (Pakistan Flood Emergency)

मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, भारताने सिंधु जल कराराचे उल्लंघन केले आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारताने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. (Pakistan Flood Emergency)

दर सेकंदाला २२ हजार घनफूट पाणी
एका अहवालानुसार, दर सेकंदाला २२ हजार घनफूट पाणी वाहून जात आहे, ज्यामुळे गारी दुपट्टा, माझोई आणि मुझफ्फराबाद सारख्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. फारुख यांनी आरोप केला की भारताने जाणूनबुजून झेलम नदीत अचानक पाणी सोडले. पूर्वी, जेव्हा जेव्हा नदीतील पाण्याची पातळी सोडली जात असे तेव्हा भारताकडून माहिती दिली जात असे. पण यावेळी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

सिंधू करार रद्द
तत्पूर्वी, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यातच भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह, इतरही संभ्याव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीने विचार करत आहे. (Pakistan Flood Emergency)

सिंधू नदीतील एक थेंब पाणीही पाकिस्तानात जाणार नाही
दरम्यान, ‘मोदी सरकारकडून सिंधू पाणी करारासंदर्भात घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय, हा पूर्णपणे न्यायसंगत आणि देशाच्या हिताचा आहे. पाकिस्तानात सिंधू नदीचे एक थेंब पाणीही जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,’ असे जल शक्तीमंत्री सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने म्हटले आहे. (Pakistan Flood Emergency)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.